agriculture news in Marathi central government opposite of farmers Maharashtra | Agrowon

केंद्र सरकार शेतकरीविरोधी ः थोरात

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. तमाम शेतकरी आणि कामगार वर्ग सरकारला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत.

कोल्हापूर : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. तमाम शेतकरी आणि कामगार वर्ग सरकारला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा महसूल मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला.

केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता.५) भव्य रॅली काढण्यात आली.   माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव,  आमदार राजूबाबा आवळे,  आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सुमारे  ५०० हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले  होते. शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा  चौक  परिसरात रॅली दाखल  झाली. या ठिकाणी शेतकरी विरोधी कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका जाहीर करताना श्री. थोरात यांनी केंद्र शासनावर जोरदार टीका केली.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांबाबत घेतलेला निर्णय त्यांच्या हिताचा नाही. त्यामुळे या विरोधात काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. केंद्राच्या या धोरणाला महाराष्ट्र सरकारही विरोध करेल. कृषीविषयक धोरणाबाबत समर्थन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी डांबरी रस्त्यावरून समर्थन करू नये. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांची परिस्थिती पहावी.

अमरावतीतही आंदोलन
अमरावती ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आदी पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...