Agriculture news in Marathi The central government should immediately start the onion export process | Agrowon

केंद्र सरकारने कांदा निर्यातप्रक्रिया तातडीने सुरू करावी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 मार्च 2020

नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्राकडून उठविण्याची घोषणा झाली असली, तरी निर्यात प्रक्रियेस उशीर होत आहे. कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. यावर केंद्र सरकारची १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरळीत होण्याची घोषणा असली तरी वाट न पाहता तातडीने निर्यात सुरू करावी, तसेच कांद्यासह अन्य शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथील चौफुलीवर गुरुवारी (ता. ५) रास्ता रोको करण्यात आला. 

नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्राकडून उठविण्याची घोषणा झाली असली, तरी निर्यात प्रक्रियेस उशीर होत आहे. कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. यावर केंद्र सरकारची १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरळीत होण्याची घोषणा असली तरी वाट न पाहता तातडीने निर्यात सुरू करावी, तसेच कांद्यासह अन्य शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथील चौफुलीवर गुरुवारी (ता. ५) रास्ता रोको करण्यात आला. 

भारतीय कांद्याला केंद्र सरकारचे निर्यातीचे धोरण नसल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे शेतमालाचे दर वाढल्यास बाजारभाव नियंत्रित करण्यासाठी हस्तक्षेप करून दर पाडले जातात, असा आरोप केंद्र सरकारवर यावेळी करण्यात आला. 

कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यातच बदललेल्या वातावरणाचा फटका उत्पादकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता केंद्रातील भाजप सरकारने तातडीने कांद्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा, अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिला आहे.

रास्ता रोको आंदोलन प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करून पोलिस वाहने आणून ठेवल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांची भाषणे झाली. यांसह महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख मागण्या

  • कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा
  • कांदा निर्यातप्रक्रिया तातडीने सुरू करा

इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...