Agriculture news in marathi Central government will build houses: Narayan Rane | Page 3 ||| Agrowon

केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल,’’ असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे येथील अतिवृष्टी बाधित नागरिकांना दिले. 

रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तसेच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल,’’ असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे येथील अतिवृष्टी बाधित नागरिकांना दिले. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (ता.२५) रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणच्या अतिवृष्टीबाधित गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला 
या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘‘कोकणात आलेल्या अतिवृष्टीच्या संकटाची वेळ ही कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना तातडीने मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे. भारतीय जनता पार्टी शक्य ती सर्व तातडीची मदत या नागरिकांपर्यंत पोहोचवित आहे. बाधित नागरिकांना केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे आणि एनडीआरएफचे अनुदान दोन्ही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.’’ 

अतिवृष्टीबाधित नागरिकांना प्राधान्य मदत करण्याला असले पाहिजे आणि पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह साऱ्याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत. बाधित नागरिकांना केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे आणि एनडीआरएफचे अनुदान दोन्ही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असेही फडणवीस म्हणाले. 

व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करणार 
रत्नागिरी : चिपळूणमधील व्यापाऱ्यांना पुन्हा पायावर उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही सगळी आमच्या घरातील माणसे आहेत. त्यांच्या डोळ्यात भविष्यात अश्रू येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ, असा दिलासा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. तसेच चिपळूणवासीयांच्या अश्रूला प्रशासन जबाबदार असल्याचाही ठपका त्यांनी ठेवला. राणे म्हणाले, ‘‘राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते आणि केंद्रात मी चिपळूणातील लोकांसाठी नुकसान भरपाई मिळवून देऊ. त्यासाठी विविध योजनांचा आधार घेतला जाईल. भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री आढावा घेऊन बैठका घेतील. पण मी थेट पंतप्रधानांना अहवाल देणार आहे. व्यापाऱ्यांना पुन्हा पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ही सगळी आमच्या घरातील माणसे आहेत.’’ 


इतर ताज्या घडामोडी
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...
कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत...