agriculture news in Marathi central government will make farmers self reliance Maharashtra | Page 2 ||| Agrowon

केंद्र सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणार ः चौधरी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांना देखील शेतीमालाचे दर ठरविता यावे याकरिता देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी केली जाणार आहे.

नागपूर : शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांना देखील शेतीमालाचे दर ठरविता यावे याकरिता देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी केली जाणार आहे. शेतकरी कंपन्यांनी उभारलेल्या भांडवलाच्या इतकीच रक्कम केंद्र सरकार यात हिस्सा म्हणून टाकेल. शेतकरी आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे पाऊल असल्याचे मत केंद्रीय कृषिराज्यमंत्री कैलास चौधरी यांनी व्यक्त केले. 

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आय.ए. आर.आय.) वार्षिक पुरस्कारांचे वितरण करताना शनिवारी (ता. २७) ते बोलत होते. देशभरातील ३५, तर महाराष्ट्रातील तीन नावीन्यपूर्ण शेतकऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. ‘आयसीएआर’चे महासंचालक त्रिलोचन महापात्रा, संस्थेचे संचालक ए. के. सिंग, इंद्र मणि मिश्र यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले. 

मंत्री चौधरी पुढे म्हणाले, की केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत. त्यांना काळे कायदे म्हणून हिणवले जाते. त्यात काळेबेरे काय आहे? हे मात्र आजपर्यंत कुणालाच सांगता आले नाही. केंद्र सरकारने शेतकरी हिताकरिता बजेटमध्ये तरतूद वाढविली आहे. ७५ हजार कोटी रुपये एकट्या किसान सन्मान योजनेवर खर्ची घातले जातात. त्यामुळेच केंद्र सरकार शेतकरी हिताला बांधील आहे हे सिद्ध होते. 

त्रिलोचन महापात्रा यांनी शेतकरी आणि शास्त्रज्ञ संवाद वाढल्यास शेतकऱ्यांना नेमके काय हवे हे जाणता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. 

शेतीमध्ये यांत्रिकीकरण, पूरक व्यवसायाची जोड, शेतीमालाचे थेट मार्केटिंग अशा विविध पातळींवर काम करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात येते. दरवर्षी २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान आयोजित मेळाव्याच्या दरम्यान या पुरस्कारांचे वितरण केले जाते. गुरुवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‍घाटन झाले.

या मेळाव्याच्या समारोपीय सत्रात देशभरातील ३५ शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. त्यामध्ये आसाम आंध्र प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, हिमाचल प्रदेश, हरियाना, उत्तराखंड, तेलंगणा, पश्‍चिम बंगाल, झारखंड प्रत्येकी एक, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, प्रत्येकी दोन, राजस्थान, उत्तर प्रदेश चार अशा ३५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

महाराष्ट्रातील तिघांचा सन्मान 
देशभरातील ३५ शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले. त्यामध्ये नावीन्यपूर्ण शेतकरी गटात धाकली (अकोला) येथील विनोद इंगोले, कृषी माउली शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रामदास ऊर्फ दिलीप फुके (चांभई, ता. मंगरूळपीर, वाशीम) तसेच अध्येता पुरस्कारार्थी रवींद्र मेटकर (अंजनगावबारी, अमरावती) यांचा समावेश आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...