Agriculture news in marathi Central Government's agricultural laws in the interest of farmers - Ahir | Page 2 ||| Agrowon

केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे : माजी केंद्रीय राज्यमंत्री अहीर 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे विचार करून शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवून केले आहेत. परंतु निव्वळ सरकारला बदनाम करण्यासाठी कथित शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन उभे केले.

गडचिरोली : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे विचार करून शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवून केले आहेत. परंतु निव्वळ सरकारला बदनाम करण्यासाठी कथित शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन उभे केले. त्यात प्रामाणिक आणि खऱ्या शेतकऱ्यांचा अभाव आणि राजकीय हस्तकांचाच भरणा अधिक असल्याचा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

हंसराज अहीर म्हणाले, ‘‘मी केंद्राच्या कृषी समितीवर दहा वर्षे होतो. वर्षांनुवर्षे देशात युरियाचा काळाबाजार होत होता. पण गेल्या सात वर्षांत हा काळाबाजार संपला आहे. खताचे भावही वाढले नाहीत.

हा काळाबाजार थांबावा यासाठी इतक्‍या वर्षांत कोणालाच आंदोलन किंवा प्रामाणिक प्रयत्न का करावे वाटले नाहीत. त्यावरूनच शेतीक्षेत्रातील काळ्या बाजारीला या सर्वांचेच समर्थन होते, असे म्हणता येईल. याच घटकांची कोंडी झाल्याने आता त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन केले जात आहे. कृषी मालाच्या किमान आधारभूत किंमतीविषयी स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी तत्कालीन केंद्र सरकारने लागू केल्या नाही.

पण भाजप सरकारने उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत दिली. राष्ट्रीय प्रकल्प वगळता सिंचनासाठी पूर्वी कधी केंद्र सरकारकडून निधी येत नव्हता. पण मोदींच्या काळात पहिल्यांदाच त्यासाठी पैसे मिळाले. गैर बासमती तांदळाची कधी निर्यात होत नव्हती. ती पहिल्यांदाच होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. असे शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले असताना केवळ सरकारला बदनाम करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे.’’ 

या वेळी भाजपच्या ओबीसी सेलचे विदर्भ संपर्क प्रमुख बाबाराव कोहळे, किसान मोर्चाचे रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, प्रशांत वाघरे, महिला मोर्चाच्या रेखा डोळस, पुष्पा करकाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...