agriculture news in marathi, Central Maharashtra, Marathwada, Vidarbha may receive rain from tommorow | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उद्यापासून पाऊस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. २४) राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे.

पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. २४) राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे.

पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढल्याने उत्तर भारतात पाऊस पडत असून, दिल्लीसह लगतच्या राज्यांमध्ये गारपीट झाली आहे. आज (ता. २३) उत्तर राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशामध्ये पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. २४) मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांत हलक्या पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आहे. 
पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या परस्पर विराेधामुळे मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये तुरळक पाऊस पडणार असून, राज्यात कोकण वगळता उर्वरित भागात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.   

उत्तरेकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह ओसरले असून, बंगालच्या उपसागरावरील उष्ण वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात सर्वच ठिकाणी तापमान वाढून ११ अंशांच्या वर गेले असल्याने थंडी नाहीशी झाली आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी (ता. २२) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.८ (-०.३), जळगाव १३.४ (१.२), कोल्हापूर १६.० (०.७), महाबळेश्‍वर ११.४ (-२.३), मालेगाव १४.२ (३.५), नाशिक १२.२, सांगली १३.३ (-१.०), सातारा १२.७ (-०.१), सोलापूर १६.५ (-०.१), सांताक्रूझ १८.४ (१.६), अलिबाग १८.५ (१.३), रत्नागिरी १७.० (-१.६), डहाणू १७.६ (०.६), आैरंगाबाद १४.६ (२.२), परभणी १४.९ (०.२), नांदेड १५.० (१.१), अकोला १२.५ (-१.९), अमरावती १३.६ (-१.२), बुलडाणा १५.० (०.१), चंद्रपूर १२.४ (-३.१), गोंदिया १३.० (-०.५), नागपूर ४.७ (-१.०), वर्धा १५.० (०.९), यवतमाळ १७.० (१.४).


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...