मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीची लाट

मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीची लाट
मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीची लाट

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसापासून उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात थंडीची लाट आली आहे. राज्यातील काही भागात किमान तापमानाचा पारा पुन्हा खाली आला आहे. धुळे जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील सर्वात कमी ५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  उत्तर भारतातील राजस्थान, बिहार, गुजरात, उडीसा, मध्य प्रदेश या भागात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर होत आहे. त्यामुळे  पारा पाच अंशांपर्यंत खाली आला आहे. धुळेनंतर नाशिकमधील निफाडमध्ये ५.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर नगरमध्ये ६.२ अंश तापमान होत. मालेगाव, नाशिक येथील किमान तापमानही दहा अंशाच्या खालीच होते. विदर्भातही थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे अकोला येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेतील तापमानात सहा अंशापर्यंत घट होऊन किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यापाठोपाठ नगर, जळगाव, नांदेड, नागपूर, यवतमाळ येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत पाच अंशाने घट झाली आहे. थंडीमुळे कोकणातील किमान तापमानाचा पारा १३ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. मध्य महाराष्ट्रात ५ ते १४ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ८ ते १३ अंश सेल्सिअस, तर विदर्भात ८ ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. विदर्भातील नागपूर, गोंदिया, अकोला या प्रमुख शहरांचा पाराही दहा अंशाच्या खाली होता. सोमवार (ता. १४) पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असून काही प्रमाणात बोचरी थंडी कायम राहणार आहे.  गुरुवारी (ता. १०) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रूझ) १४.६ (-३), अलिबाग १६.४ (-१), रत्नागिरी १६.३ (-३), डहाणू १३.७ (-३), पुणे ८.८ (-२), जळगाव ६.६ (-५), नगर ६.२ (-५), कोल्हापूर १४.९ (-१), महाबळेश्वर १४.० (१), मालेगाव ९.२ (-२), नाशिक ९.० (-१), निफाड ५.८, सांगली १०.८ (-३), सातारा १०.३ (-२), सोलापूर १३.८ (-२), औरंगाबाद ८.७ (-३), परभणी ९.५ (-४), उस्मानाबाद १३.०, नांदेड ९.५ (-५), अकोला ८.२ (-६), अमरावती ११.८ (-३), बुलडाणा १०.६ (-४), चंद्रपूर १०.४ (-४), गोंदिया ८.५ (-४), नागपूर ७.७ (-५), वर्धा १०.९ (-३), यवतमाळ १०.४ (-५)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com