agriculture news in marathi, central minister discuss with scientist on several issues, nagpur, maharashtra | Agrowon

शेतकरीभिमुख संशोधनाची गरज ः केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

नागपूर  ः संशोधकांनी आपले संशोधन अधिकाधिक शेतकरीभिमुख करण्याची गरज आहे. त्या माध्यमातूनच कमी श्रमात शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्पन्न घेणे शक्‍य होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला मंत्री गिरिराजसिंह यांनी रविवारी भेट दिली. या वेळी त्यांनी संशोधकांशी संवाद साधला. कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर या वेळी उपस्थित होते.

नागपूर  ः संशोधकांनी आपले संशोधन अधिकाधिक शेतकरीभिमुख करण्याची गरज आहे. त्या माध्यमातूनच कमी श्रमात शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्पन्न घेणे शक्‍य होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला मंत्री गिरिराजसिंह यांनी रविवारी भेट दिली. या वेळी त्यांनी संशोधकांशी संवाद साधला. कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर या वेळी उपस्थित होते.

गिरिराजसिंह म्हणाले, की संशोधकांविषयी आपल्या नितांत आदर आहे. पशुपालक असल्याने या क्षेत्रातील अडचणींची मला जाण आहे. त्यामुळेच त्या सोडविण्याचे प्रयत्न केले जातील. संशोधकांनीदेखील संशोधन करून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि व्यावसायिक पिकांचे पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. शेतकऱ्यांचा नफा वाढावा, हाच एकमेव उद्देश संशोधनाचा असला पाहिजे. शेतीपूरक व्यवसायात दुग्धोत्पादनात संधी आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर देशी गोवंशाची दूध उत्पादकता वाढविणे, वंशावळ सुधारसारख्या उपक्रमांवर भर देण्याची आवश्‍यकता आहे.  या वेळी कुलगुरू डॉ. पातूरकर यांनी विद्यापीठस्तरावरील संशोधनाची माहिती दिली.

इतर ताज्या घडामोडी
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१...परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने...
हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदीनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...
वऱ्हाडात टेक्स्टटाइल, अन्न प्रक्रिया...अकोला  ः विदर्भातील वऱ्हाड हा भाग...
पावसाळी वातावरणात डाऊनी नियंत्रणासाठी...सर्वच द्राक्ष विभागामध्ये गुरुवार ते सोमवार (ता....
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...