केंद्रीय पथकासाठी शेतकरी दिवसभर ताटकळले

केंद्रीय पथकासाठी शेतकरी दिवसभर ताटकळले
केंद्रीय पथकासाठी शेतकरी दिवसभर ताटकळले

सोलापूर  : दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार म्हणून करमाळा तालुक्यातील पाच-सहा गावांत आधीच सूचना देऊन प्रशासनाने शेतकऱ्यांना तयारीत राहण्याची सूचना केली. त्याप्रमाणे बुधवारी (ता. ५) दिवसभर शेतकरी केंद्रीय पथकाकडे डोळे लावून बसले. पण संध्याकाळचे पाच वाजूनही पथक काही शिवारात पोचले नव्हते. परिणामी संपूर्ण दिवसभर शेतकऱ्यांवर ताटकळत बसण्याची वेळ आली.  

दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी तीन केंद्रीय पथके राज्यात दाखल झाली आहेत. छावी झा, ए.के.तिवारी, शालिनी सक्‍सेना, सुभाषचंद्र मीना, एम.जी. टेंभूर्णे, विजय ठाकरे, मनेश चौधरी, एस.सी. शर्मा या आठ अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. त्यापैकी एक पथक मराठवाडा आणि नगरचा दौरा करून सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात येणार होते. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी (ता. ३) स्वतः या भागातील फिसरे, सालसे, पांडे, बिटरगाव (श्री), जातेगाव या गावांना भेट दिली. तेथील शेतकऱ्यांना तयार राहण्याची सूचना केली. तसेच केंद्रीय पथकाला काय-काय दाखवायचे हेही ठरवले. नियोजनाप्रमाणे नगरहून हे पथक करमाळ्यात येणार होते. साधारण दुपारी तीन ते चारच्या दरम्यान पथक करमाळ्यात येईल, असे अपेक्षित होते. पण बुधवारी संध्याकाळचे पाच वाजले तरी पथक करमाळ्यात पोचले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त झाली.

सोलापूरची पाहणी ५५ मिनिटांत

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्‍यांमधील ९१ पैकी ८९ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार करमाळा तालुक्‍यातील पाच, तर सांगोला आणि मंगळवेढा तालुक्‍यातील प्रत्येकी एका गावाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा नियोजित वेळ अवघ्या ५५ मिनिटांचा आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत दुष्काळाची पाहणी कशी होणार, हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com