agriculture news in marathi central state minister Dhotre stands in a que for vegetable purchase | Agrowon

केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे स्वत: बनले भाजीपाला ग्राहक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 एप्रिल 2020

थेट भाजीपाला विक्रीचा प्रयोग शहरात कमालीचा यशस्वी ठरू लागला आहे. रविवारी (ता.१२) केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व सुहासिनी धोत्रे यांनी स्वतः शेतकरी गटाकडून ताजा भाजीपाला व फळे खरेदी केले.

अकोला : सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांना ताजा भाजीपाला मिळावा यासाठी थेट भाजीपाला विक्रीचा प्रयोग शहरात कमालीचा यशस्वी ठरू लागला आहे. रविवारी (ता.१२) केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व सुहासिनी धोत्रे यांनी स्वतः शेतकरी गटाकडून ताजा भाजीपाला व फळे खरेदी केले.

अकोल्यात कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत शेतकरी गटाची नोंदणी झालेल्या गटामार्फत भाजीपाला व फळे विक्री सुरू आहे. प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी पुढाकार घेऊन कृषी व आत्मा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली थेट शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री केन्द्र तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून नोंदणी घेत विक्री सुरू केली आहे.

डोंगरगाव, मासा येथील शेतकरी गटाचे प्रफुल्ल फाले, योगेश नागापुरे यांचे यावेळी मंत्री धोत्रे यांनी विशेष कौतुक केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी डी. एस. प्रधान, सिसा (उदे) कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. गजानन तुपकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, कृषी सहाय्यक ए. बी. करवते यावेळी उपस्थित होते. यावेळी धोत्रे यांनी शहरातील नागरिकांना या विक्री पद्धतीने ताजा भाजीपाला,फळे उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त केले. तसेच इतर शेतकऱ्यांनाही विक्रीसाठी सुविधा देण्याची सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...