केंद्रीय पथक नांदेड जिल्ह्यात फिरकलेच नाही

खरीप हंमागादरम्यानमराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यात नांदेडचा समावेश असूनही केंद्राच्या पथकाने नांदेडकडे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
The central team did not turn up in Nanded district
The central team did not turn up in Nanded district

नांदेड : खरीप हंमागादरम्यान अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील ५ लाख ६४ हजार हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, कापूस, उडिद, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यात नांदेडचा समावेश असूनही केंद्राच्या पथकाने नांदेडकडे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नांदेडमध्ये  जून ते ऑक्टोबर कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे सोळा तालुक्यांतील ७ लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यात जिरायती क्षेत्रातील ५ लाख ६३ हजार ४०९ हेक्टर, बागायती क्षेत्रातील ७०० हेक्टर व ४०९ हेक्टरवरील फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल कळविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना ५६५ कोटी रुपयाच्या भरपाईची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. यातील २८२ कोटींचा हप्ता जिल्ह्याला प्राप्त झाल्यामुळे त्याचे वाटप सध्या होत आहे.

दरम्यान केंद्र शासनाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पथकाला मराठवाड्यात पाचारण केले होते. या पथकाने औरंगाबाद, जालना आदी जिल्ह्यांना भेट देऊन पाहणी केली. या नंतर हे पथक मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या नांदेड येथे येऊन पाहणी करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु हे पथक विदर्भात गेले. यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पीकविम्या बाबतही नाराजी जिल्ह्यात साडेनऊ लाख अर्जदारांनी खरिपासाठी पीकविमा भरला आहे. अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे खरिपात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बाबत शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानीबाबत विम्याचा परतावा अपेक्षेनुसार मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सरसकट पीकविमा मिळावा, अशी मागणी करीत धरणे आंदोलन केले आहे. या बाबत राजकीय पक्षांसह शेतकरी संघटनाही या आंदोलनात उतरल्या आहेत. कंपनीकडून मात्र पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षानुसार उत्पादकता जाहीर झाल्यानंतर विम्याबाबत निर्णय होईल, असे कळविले आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हाती काही लागले नाही. केंद्राचे पथक आले असले तर त्यांच्यापुढे व्यथा मांडता आल्या असत्या. परंतु पथकाने पाठ फिरविल्यामुळे आमचा हिरमोड झाला आहे. - सदाशिव पाटील, शेतकरी, बेनाळ (ता. मुखेड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com