agriculture news in Marathi central team inspect cotton crop Maharashtra | Agrowon

केंद्रीय पथकाकडून कापूस पिकाची पाहणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

 गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पुसद तालुक्यातील कापूस पीक उद्‍ध्वस्त झाले. 

आरेगाव, यवतमाळ ः गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पुसद तालुक्यातील कापूस पीक उद्‍ध्वस्त झाले. याच बाधित कपाशी पिकाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय एकात्मिक पीक व्यवस्थापन केंद्राच्या पथकाने वरुड येथील शेतात कापूस व तूर पिकांची पाहणी केली. या पथकात एस. महेश, नटराज कारोतीया यांचा समावेश होता.

वरुड येथील इंदूबाई माधव पडघणे यांच्या शेतात भेट देऊन पथकातील सदस्यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. कापसाच्या बोंडात गुलाबी बोंड अळी असून, पहिल्या वेच्यानंतरच कापसाची अवस्था वाईट आहे, असे उपस्थित शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना सांगितले. तसेच नुकत्याच येऊन गेलेल्या हलक्या पावसाने व ढगाळ वातावरणाने तुरीलाही धोका निर्माण झाला आहे, असे सांगितले.

या वेळी पथकासमवेत तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, मंडळ कृषी अधिकारी भारत चेके, कृषी सहायक पी. जी. चेलमेलवार उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी तालुक्यातील कापूस लागवडीचे क्षेत्र व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राची माहिती देऊन केलेल्या उपाययोजना पथकाला सांगितल्या.

पथकातील सदस्यांनी पीक परिस्थितीबाबत लवकरच अहवाल सादर केल्या जाईल, असे शेतकऱ्यांना सांगितले. पिकांचे नुकसान झालेल्या परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. दुर्दैवाने तालुक्याला तीन आमदार असताना एकानेही याप्रश्‍नी भरपाईसाठी पाठपुरावा केला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
 


इतर अॅग्रो विशेष
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...