Agriculture news in Marathi Central team inspects flooded area | Page 2 ||| Agrowon

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 सप्टेंबर 2020

गेल्या महिन्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले.

नागपूर : गेल्या महिन्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले.

विभागीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांकडून झालेल्या पुराच्या आकडेवारी संदर्भातील माहिती घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्याला प्रथम भेट दिली. पुराच्या तडाख्याने शेतकरी व गावकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची व्याप्ती आणि तीव्रता त्यांच्या लक्षात आली. कामठी तालुक्यात सोनेगाव येथे त्यांनी भेट दिली.

या पथकामध्ये केंद्रीय पथकातील महेंद्र सहारे, एस. एस. मोदी आणि आर. पी. सिंग यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व अधिनस्थ अधिकारी तसेच महसूल विभागाचे या भागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सोनेगावचे पायाभूत सुविधायुक्त ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी केंद्रीय पथकाकडे केली.

कन्हान नदीच्या पुराचे पाणी पात्र सोडून दोन्ही बाजूंनी पाच किलोमीटरपर्यंत पसरले होते. त्यामुळे नदीकाठावरील घरे, शेती पिके, सोयाबीन, कापसाचे प्रचंड नुकसान झाले. सुरुवातीला धानाचे पऱ्हे निघाले नाहीत. त्यामुळे त्यांची दुबार टाकणी करावी लागली असल्याची माहिती ग्रामस्थांनी पथकाला दिली. स्थानिक प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांची तपासणी करून नामदेव राऊत यांचे संपूर्ण घर पुरात वाहून गेले. तर मधुकर चौधरी यांची गाय वाहून गेल्याचे संबंधितांनी सांगितले. तर अशोक उमाजी महल्ले यांचे पूर्ण पऱ्हाटीसह शेतीचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती श्री. महल्ले यांनी दिली. तसेच नेरीचे शेतकरी गजानन झाडे यांनीही सोयाबीन, कापसाचे नुकसान झाल्याचे सांगितले.

निलज येथील सचिन राजाराम दुपारे या शेतकऱ्याच्या शेतातील पुराच्या पाण्यामुळे टमाटे, मिरची, कापूस, सोयाबीन, धानाचे नुकसान झाले आहे. बोगस सोयाबीन बियाण्यामुळे अगोदरच संकटात‌ सापडलेल्या शेतकऱ्याला कंपनीशी संपर्क साधला असता, कंपनी दोन बँकांचे पैसे परत करणार असल्याचे त्यांनी पथकाला सांगितले.

पथकाने घेतली आढावा बैठक
यापूर्वी केंद्रीय पथकाने विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पथकाला माहिती दिली. विभागात ३४ तालुक्यांतील ८८ हजार ८६४ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून भात कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी उर्ध्वनलिकांची नुकसान झाले. विभागात २३ हजार घरांची पडझड झाली असल्याची माहिती श्री. कुंभेजकर यांनी दिली


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...