दुष्काळप्रश्नी मदतीबाबत केंद्रीय पथक सकारात्मक; मंत्र्यांसमवेत बैठक

दुष्काळप्रश्नी मदतीबाबत केंद्रीय पथक सकारात्मक; मंत्र्यांसमवेत बैठक
दुष्काळप्रश्नी मदतीबाबत केंद्रीय पथक सकारात्मक; मंत्र्यांसमवेत बैठक

मुंबई : राज्यात दुष्काळ स्थिती असल्यामुळे मदत देण्यासाठी केंद्राच्या पथकाने सहमती दर्शविली असून, पाहणी अहवाल लवकरात लवकर केंद्र सरकारला सादर करू, असे आश्‍वासन केंद्रीय सहसचिव छवी झा यांनी दिले. तर दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाकडे ७ हजार ९६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असून, यातला जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आल्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  राज्य शासनाने याआधी केंद्र सरकारला ७,५२२ कोटी रुपयांच्या मदतीचे निवेदन पाठवले होते. त्यात आणखी ४४० कोटी रुपयांची वाढ करत सुधारित ७,९६२ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर होणारा अतिरिक्त खर्च विचारात घेऊन त्यात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.  राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाने पाठविलेल्या तीन पथकांनी गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागातील दौरे केले. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात या पथकांनी राज्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्या वेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, दुग्धविकास, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आदी या वेळी उपस्थित होते. केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव छवी झा, ए. के. तिवारी, विजय ठाकरे, मानश चौधरी, एस. सी. शर्मा आदींचा समावेश होता. मंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्व मंत्र्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर केंद्र शासनाच्या निकषानुसार १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे आणखी २६८ मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करून राज्य शासनाच्या मदतीतून तेथे उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. अद्यापही काही ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असून त्याची तपासणी करून येत्या दोन ते तीन दिवसात त्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील दुष्काळाची स्थिती बिकट आहे. केंद्रीय पथकांना पाहणीमध्येही ही स्थिती दिसून आली आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे ७ हजार ९६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी राज्याच्या वतीने या पथकाकडे मागणी केली आहे. केंद्र शासनाच्या पथकांनीही मदत मिळवून देण्यासाठी सहमती दर्शविली आहे. केंद्र शासनाच्या पथकांनी राज्यातील दौऱ्याच्या वेळेची निरीक्षणे बैठकीत मांडली. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ असून जनतेकडून चारा छावण्या व टँकरची मागणी आहे. राज्यातील अनेक भागात येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात चारा व पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण पथकातील सदस्यांनी या वेळी नोंदविले. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामे वाढविण्यात यावीत, तसेच जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.  हा तसेच दुष्काळ निवारणासाठी पाठविण्यात आलेल्या विविध प्रस्ताव तातडीने मंजुरी मिळावी, अशी राज्याच्या वतीने या वेळी मागणी करण्यात आली. राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, राज्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक असून केंद्रीय पथकाच्या पाहणीत दिसून आले आहे. राज्याला जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी केंद्र शासनास आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता तातडीने करण्यात येईल. ९८ लाख टन चारा उपलब्ध राज्यात सध्या सुमारे ९८ लाख टन चारा उपलब्ध असून आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात चाऱ्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाने गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यातून ५० हजार हेक्टर क्षेत्रावर सुमारे २५ लाख मेट्रिक टन चारा उत्पादन होईल असा अंदाज आहे, अशी माहिती केंद्रीय पथकाला देेण्यात आली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून दुष्काळी भागात अतिरिक्त ५० दिवसांचे काम देण्यासाठी केंद्र शासनाकडे ८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com