agriculture news in Marathi central team will visit for survey of crop loss Maharashtra | Agrowon

केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या झालेल्या हानीची माहिती केंद्रीय पथकाला दिली जाणार आहे. दरम्यान, पथकाला पोलिस संरक्षण देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 

पीक नुकसानीचा आढावा व शेतीची पाहणी करण्यासाठी गुरुवारी (ता. २१) केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव डॉ. व्ही. थिरूपुगर्झ, केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या खर्च विभागाचे सल्लागार डीना नाथ, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक के. मनोहरन, कापूस संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग, कडधान्य संचालनालयाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र यांचा या पथकात समावेश आहे. 

पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या झालेल्या हानीची माहिती केंद्रीय पथकाला दिली जाणार आहे. दरम्यान, पथकाला पोलिस संरक्षण देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 

पीक नुकसानीचा आढावा व शेतीची पाहणी करण्यासाठी गुरुवारी (ता. २१) केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव डॉ. व्ही. थिरूपुगर्झ, केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या खर्च विभागाचे सल्लागार डीना नाथ, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक के. मनोहरन, कापूस संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग, कडधान्य संचालनालयाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र यांचा या पथकात समावेश आहे. 

औरंगाबाद, अमरावती, नागपूर व नाशिक या विभागांतील जिल्ह्यांमध्ये पथक जाणार आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून या पथकांना अहवाल दिला जाईल, तसेच सादरीकरणदेखील होईल. पथकाने केलेल्या अहवालावरच केंद्रातून हजारो कोटींची मदत मिळणार असल्याने राज्याची यंत्रणा काटेकोर नियोजन करीत आहे. 

“पथकाकडून २४ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील स्थिती जाणून घेतली जाईल. शेतीच्या नुकसानीबाबत केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही शंका असल्यास त्याचे निरसन होण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे व शेतकऱ्यांची माहिती पुरवावी असे आदेश आम्ही दिले आहेत,’’ अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. 

केंद्रीय पथकाला नेमक्या कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या गावात न्यायचे, तसेच काय माहिती द्यायची याचे नियोजन करण्याचे काम विभागीय आयुक्तांकडे देण्यात आलेले आहेत. राज्यातील आयुक्त गेल्या दोन दिवसांपासून याच नियोजनात गुंतलेले होते. 

“केंद्रीय पथकाला राज्य अतिथी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे, त्यामुळे पोलिस संरक्षणात संपूर्ण दौरे केले जातील. पथकासमोर काहीही अनुचित प्रकार घडून राज्याच्या प्रशासनाबाबत उलटसुलट संदेश केंद्रात जाऊ नये म्हणून काळजी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व कृषी विभागाला देण्यात आलेल्या आहेत. पीकविमा व पीकपंचनामे अशा दोन्ही मुद्द्यांवर काही भागांत शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याने आंदोलनात्मक कृतीला पथकाला सामोरे जावे लागू नये यासाठी आम्हाला काळजी घ्यावी लागत आहे,’’ असे महसूल विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.


इतर अॅग्रो विशेष
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...