agriculture news in Marathi central will be studied crop insurance recommendations Maharashtra | Agrowon

पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून अभ्यास 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावण्यासाठी धोरणात्मक बदलाबाबत राज्य शासनाने केलेल्या सूचनांचा अभ्यास केंद्र सरकारने सुरू केला आहे. 

पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावण्यासाठी धोरणात्मक बदलाबाबत राज्य शासनाने केलेल्या सूचनांचा अभ्यास केंद्र सरकारने सुरू केला आहे. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. आशिषकुमार भूतानी यांनी दिल्लीत शिष्टमंडळाशी चर्चा करताना ही माहिती दिली. शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात ​विजय चौधरी (खुलताबाद), श्रीकांत आखा​​डे (जालना), कृष्णा पवार (औरंगाबाद), जितेंद्र सानप (बुलडाणा), अनंता पाटील (हिंगोली) या शेतकऱ्यांचा समावेश होता. 

केंद्रीय कृषिराज्यमंत्री कैलास चौधरी, तसेच पीकविमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद सांभाळणाऱ्या डॉ. भूतानी यांची भेट घेत विमा योजनेतील अडचणी सांगितल्या. ‘‘राज्य शासनाने यापूर्वी बीड जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने विमा योजना राबविली. या पद्धतीत विमा कंपनीला कमाल नफा २० टक्क्यांपर्यंत स्वतःकडे ठेवत उर्वरित रक्कम शासनाला परत करावी लागली. यामुळे हीच पद्धत सर्वत्र लागू करा,’’ अशी मागणी शिष्टमंडळाने केली. 

डॉ. भूतानी या वेळी म्हणाले, ‘‘केवळ एका हंगामात, एका जिल्ह्यात लागू केलेल्या प्रयोगावर आधारित धोरणात्मक बदल करता येत नाही. आम्ही राज्य शासनाकडून पाच वर्षांची सविस्तर माहिती मागवली आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. मुळात, मध्य प्रदेशात असे प्रयोग अपयशी ठरले आहेत. यात दुसरा धोका असाही आहे, की विमा कंपन्या भरपाई देण्यास टाळाटाळ करू शकतात. तसेच आकडेवारीशीदेखील छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.” 

अनामत रकमा घ्या 
विमा कंपन्यांना कंत्राटे वाटतानाच अनामत रकमादेखील घ्यावात व विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा न केल्यास या अनामतीमधूनच शेतकऱ्यांना भरपाई देण्याची तरतूद करावी. तसेच बॅंकांनी चुका केल्यास त्यांच्या चार टक्के सेवाशुल्कातून भरपाई देण्याचा नियम लागू करावा, अशा सूचना शिष्टमंडळाने केल्या. त्या समजावून घेत पुढील हंगामापासून सुधारणा करण्याचे आश्‍वासन डॉ. भूतानी यांनी दिले. 

शिष्टमंडळाने विम्याबाबत काय मागण्या केल्या 

  • राज्यभर बीडसारखी विमा पद्धत लागू करा 
  • विमा कंपन्यांकडून अनामती घ्या 
  • बॅंकांनी चुका केल्यास सेवाशुल्कात कपात करा 
  • महसूल मंडळांची नोंदणी आपोआप व्हावी 

इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...