agriculture news in marathi Centre cabinets sanctions Atmanirbhar Bharat yojan | Agrowon

आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 मे 2020

आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत जाहीर योजनांवर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.२०) मंजुरीची मोहोर उठविली. यात लिक्विडिटी पॅकेज, आठ कोटी मजुरांना दोन महिने निशुल्क धान्यपुरवठा, महसुली भागीदारी तत्वावर कोळसा खाणींचा लिलाव यासारख्या प्रस्तावांचा समावेश होता.

नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत जाहीर योजनांवर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.२०) मंजुरीची मोहोर उठविली. यात एनबीएफसी आणि गृहकर्जपुरवठा कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीच्या लिक्विडिटी पॅकेज, आठ कोटी मजुरांना दोन महिने निशुल्क धान्यपुरवठा, महसुली भागीदारी तत्वावर कोळसा खाणींचा लिलाव यासारख्या प्रस्तावांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पाच दिवस पत्रकार परिषद घेऊन त्यातील निर्णयांची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक होऊन त्यात पॅकेजशी निगडीत प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. आर्थिक व्यवहार विषयक समितीनेही काही निर्णयांना हिरवा कंदील दाखवला. यात एमएसएमईतील सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी ३ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचा समावेश होता. पॅकेजमध्ये या घोषणेचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला होता.

लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या आठ कोटी स्थलांतरीत मजुरांना दोन महिन्यांपर्यंत निशुल्क धान्य देण्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. याअंतर्गत लाभार्थ्यांना शिधापत्रिका नसली तरीही प्रतिव्यक्ती पाच किलो गहू अथवा तांदूळ आणि प्रतिकुटुंब एक किलो डाळ मिळेल.

महसुली भागीदारीच्या निकषानुसार कोळसा उत्खननासाठीच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहार विषयक समितीने मंजुरी दिली. पॅकेजमधील घोषणेनुसार कोळसा क्षेत्रातील सरकारची एकाधिकारशाही संपुष्टात आणण्याचे आणि खासगी क्षेत्राला यात प्रोत्साहन देण्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले होते.

प्रधानमंत्री वय वंदन योजनेची मुदत तीन वर्षे वाढवण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. वय वंदना योजनेला सध्याची मुदत ३१ मार्च २०२० होती. ती वाढवून मार्च २०२३ करण्यात आली. यात साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीना १० वर्षांच्या गुंतवणुकीवर मासिक अथवा वार्षिक निवृत्तीवेतनाचा लाभ घेता येईल. यात दर वर्षी व्याजदरात सुधारणा होणार असली तरी २०२०-२१ वर्षासाठी ७.४० टक्के परतावा मिळेल.

या व्यतिरिक्त एनबीएफसी आणि गृहवित्तपुरवठा कंपन्यांच्या आर्थिक मदतीसाठी जाहीर केलेल्या ७० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजलाही हिरवा कंदील दाखवला. याअंतर्गत बॅंकेतर वित्तपुरवठा कंपन्यांसाठी मदत आराखडा देखील तयार केला जाणार आहे. या निर्णयाचे सुतोवाच यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आले होते. त्यानंतर आत्मनिर्भर भारतच्या पॅकेजमध्ये या घोषणेचा पुनरुच्चार झाला होता.

मंत्रिमंडळाचे अन्य निर्णय

  • कोळसा, इग्नाईट खाणीच्या लिलावांसाठी नवे नियम तसेच नवे उत्खनन क्षेत्रांना मंजूरी
  • सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्याला मंजुरी
  • मच्छिमारांसाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मंजुरी

इतर अॅग्रोमनी
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दराचा...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पंधरा...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर...नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर...
ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन...सध्या शेतकरी कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर करार...
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळीजळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
सोयाबीनची चाल पाच हजारांकडे  पुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड...
बेदाणा दरात सुधारणासांगली ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून...
नाईक सूतगिरणीचा कंटेनर निघाला चीन,...पुसद, जि. यवतमाळ : लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा...
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगात चीनची मोठी...जळगाव ः भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार...
साखर निर्यात यंदा ठरणार फायदेशीरकोल्हापूर : साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या...
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटलीसांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...