agriculture news in marathi, Centre declares Kharif MSP for 2018-19 | Agrowon

हमीभाव जाहीर : कापसात ११३०; तर सोयाबीनमध्ये ३४९ने वाढ

वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचा दावा करत केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप २०१९ करिताच्या हमीभाव आज (ता.४) जाहीर केले. यात सर्वाधिक वाढ ही कारळात १८२७, मूगात १४००, सुर्यफूलात १२८८ आणि कापसात ११३० रुपयांपर्यंत वाढ करण्यात अाली. सोयाबीनमध्ये ३४९ रुपये वाढ करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचा दावा करत केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप २०१९ करिताच्या हमीभाव आज (ता.४) जाहीर केले. यात सर्वाधिक वाढ ही कारळात १८२७, मूगात १४००, सुर्यफूलात १२८८ आणि कापसात ११३० रुपयांपर्यंत वाढ करण्यात अाली. सोयाबीनमध्ये ३४९ रुपये वाढ करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.४) झालेल्या बैंठकीत हमीभाव जाहीर करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खरिपातील १४ पिकांच्या हमीभावात केंद्रीय कृषी मुल्य आयोगाने काढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ५० टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सिंह यांनी दिली. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया हरसिमत कौर बादल अादी उपस्थित होते.

माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांच्यानंतर पहिल्यांदाच हमीभावात एेतिहासिक वाढ करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत देशातील शेतकऱ्यांसाठी एेतिहासिक निर्णय घेण्यात अाला. देशातील सर्वात मोठा उत्पादक, उपभोक्ता आणि ग्राहक असलेल्या शेतकऱ्यांस स्वातंत्रयानंतर कधीही आपल्या उत्पादनात वाजवी किंमत मिळाली नाही. स्वाभाविकपणे शेतकऱ्यांना याबाबत प्रचंड नाराजी होती. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मागील अर्थसंकल्पातच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट हमीभावाबाबत आश्‍वासन दिले होते. याशिवाय २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचेही पंतप्रधानांनी जाहीर केले होते, त्याच दिशेने आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला. दीडपट हमीभाव धरताना सर्व प्रकाराच्या श्रमामुळे येणारा खर्चही धरण्यात अाला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर १५ हजार कोटी रुपये अधिक भार पडणार आहे.’’
 

खरिप २०१८-१९ करिताचे १४ पिकांचे हमीभाव (क्विंटलचे रुपयात) 

 
पीक  २०१७-१८ यंदाची वाढ २०१८-१९
भात  १५५० २०० १७५०
भात (ग्रेड ए) १५९० १८० १७७०
ज्वारी (संकरीत)  १७०० ७३० २४३०
ज्वारी (मालदांडी) १७२५ ७२५ २४५०
बाजरी १४२५ ५२५ १९५०
मका १४२५ २७५ १७००
नाचणी १९०० ९९७ २८९७
तूर ५२५० २२५ ५६७५
मूग ५३७५ १४०० ६९७५
उडीद ५२०० ४०० ५६००
कापूस (मध्यम धागा) ४०२० ११३० ५१५०
कापूस (लांब धागा) ४३२० ११३० ५४५०
भूईमूग ४२५० ४४० ४८९०
सुर्यफूल ४००० १२८८ ५३८८
सोयाबीन २८५० ३४९ ३३९९
तीळ ५२०० ९४९ ६२४९
कारळ ३९५० १८२७ ५८७७

शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून मागणी होती उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा, ती केंद्र सरकारने आज मान्य केली, केंद्र सरकारचे आभार, क्रांतिकारी निर्णय, हे शेतकरी हिताचे सरकार आहे,
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


इतर अॅग्रो विशेष
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...