agriculture news in Marathi Centre offers 847,000 tn pulses from buffer stock to check prices Maharashtra | Agrowon

केंद्र सरकार कडधान्याचा पुरवठा करणार; डाळींच्या दरांवर नियंत्रणासाठी निर्णय

कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

नवी दिल्ली: खरिप हंगामात कडधान्याचे उत्पादन घटल्याने बाजारात डाळींचे दर वाढले आहेत. दर नियंत्रणासाठी किंमत स्थिरीकरण योजनेतून केंद्र सरकारने राज्यांना बफर स्टॉकमधील ८ लाख ४७ हजार टन कडधान्य पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून मिळाली. सरकार बाजारातील सरासरी दरावर कडधान्य देणार आहे. 

नवी दिल्ली: खरिप हंगामात कडधान्याचे उत्पादन घटल्याने बाजारात डाळींचे दर वाढले आहेत. दर नियंत्रणासाठी किंमत स्थिरीकरण योजनेतून केंद्र सरकारने राज्यांना बफर स्टॉकमधील ८ लाख ४७ हजार टन कडधान्य पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून मिळाली. सरकार बाजारातील सरासरी दरावर कडधान्य देणार आहे. 

खरिप हंगामात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे कडधान्य पेरणीला उशीर झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. तसेच पीक काढणीच्या काळात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मूग आणि उडिद पिकांना याचा मोठा फटका बसला. त्यामुळे बाजारात हरभऱ्याच्या दरातही वाढ झाली आहे.

मागील वर्षी खरिपात ८६ लाख टन कडधान्य उत्पादन झाले होते. त्यातुलनेत यंदा ८२ लाख टन उत्पादन झाले आहे. खरिपातील घटलेल्या उत्पादनाचा परिणाम रब्बीतील कडधान्याच्या दरावर झाला आहे. बाजारात दर वाढले असून, केंद्र सरकार दर नियंत्रणासाठी हालचाली करत आहे. केंद्र सरकारने २०१८-१९ मध्ये कडधान्याचा १४ लाख टन बफर स्टॉक केला होता. त्यापैकी ८ लाख ४७ हजार टन राज्यांना वाढते दर नियंत्रणासाठी केंद्राने देण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या अकोला बाजारात तुरीचे दर प्रतिक्विंटल ७०० हजार रुपये आहेत. हे दर मागील वर्षी याच काळात असलेल्या दरापेक्षा ४०० ते ५०० रुपयाने अधिक आहेत. मागील वर्षी या काळात उडदाला ४ हजार ५०० रुपये दर होता. यंदा मात्र दर ६ हजार ७०० रुपयांवर पोचला आहे. 

व्यापारी म्हणतात उत्पादनात१५ लाख टनाने घट
सरकारने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार खरिप कडधान्य उत्पादनात केवळ ४ लाख टनाने घट झाली आहे. मात्र बाजारातील जाणकारांच्या मते, सरकारने उत्पादनाचा अंदाज जाहीर केलेला अंदाज हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या आधी जाहीर केलेला आहे. खरिपातील कडधान्य उत्पादनात जवळपास १५ लाख टनाने घट झाली आहे. उडिद उत्पादनात १० लाख टनाने तर मूग उत्पादनात ३ ते ५ लाख टनाने घट झाली आहे. 

`उडिद वगळता कडधान्य देऊ नये`
उडिद वगळता इतर कडधान्यांचे दर हे हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने उडिद वगळता इतर कडधान्यांचा बफर स्टॉकमधून पुरवठा करू नये, अशी मागणी भारतीय कडधान्य आणि धान्य असोसिएशनने केली आहे. ‘‘सध्या बाजारात केवळ उडिदाचेच दर हमीभावापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे केंद्राने केवळ उडदाचा बफर स्टॉकमधून पुरवठा केला असता, तर या निर्णयाचे स्वागत केले असते. मात्र, इतर कडधान्यांचे दर हे हमीभावापेक्षा कमी आहेत,’’ असे असोसिएशनचे अध्यक्ष जितू भेडा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 


इतर अॅग्रोमनी
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...