केंद्राची धोरणे शेतकरी, कामगारविरोधी : किसान सभा

सेलू येथे केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेतर्फे शनिवारी (ता. ५) निदर्शने करण्यात आली. देशव्यापी आंदोलनाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
Centre's policies are anti-farmer, anti-worker
Centre's policies are anti-farmer, anti-worker

परभणी : जिल्ह्यातील सेलू येथे केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेतर्फे शनिवारी (ता. ५) निदर्शने करण्यात आली. देशव्यापी आंदोलनाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

यावेळी किसान सभेतर्फे कोरोना काळातील सर्व वीजबिल माफ करावी. रोजगार बुडालेल्या सर्व कुटुंबांना महिना १० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात यावे. २ लाख रुपये वरील सर्व कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. कोरोना निदान चाचणी मोफत करावी. कोरोना बाधीत व्यक्तींना खासगी रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात कॉ. रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे पाटील उद्धव पौळ, दत्तुसिंग ठाकूर, नारायण पवार, विष्णू चव्हाण, दिलीप दौड, भास्कर नाना कदम, रोहीदास हातकडके, राजेभाऊ साखरे, शिवाजी रणखांबे, सोपान मगर, गोविंद पौळ, धोंडिराम तारडे आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com