Agriculture News in Marathi Century of sugar production | Agrowon

साखर उत्पादनाची शतकी मजल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 जानेवारी 2022

देशात यंदाचा साखर हंगाम सुरू झाल्यापासून पहिल्या तिमाहीतच साखर उत्पादनाने शतकी मजल गाठली आहे. ३१ डिसेंबरअखेर देशात ११५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.८१ लाख टन साखर जादा उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर : देशात यंदाचा साखर हंगाम सुरू झाल्यापासून पहिल्या तिमाहीतच साखर उत्पादनाने शतकी मजल गाठली आहे. ३१ डिसेंबरअखेर देशात ११५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.८१ लाख टन साखर जादा उत्पादन झाले आहे. महाराष्ट्राने डिसेंबरअखेर आपली आघाडी कायम ठेवली असून नजीकचा प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात तब्बल १५ लाख टन साखर जादा उत्पादन झाले आहे. ३१ डिसेंबरअखेर महाराष्ट्रात ४५ लाख टन साखर तयार झाली. उत्तर प्रदेशात ३० लाख टन उत्पादित झाली आहे. 

राज्यात चाळीस टक्के उत्पादन
देशाच्या एकूण उत्पादनाच्या जवळजवळ ४० टक्के साखर एकट्या महाराष्ट्रात तयार होत असल्याचे साखर उद्योगाच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात गेल्यावर्षी पेक्षा १० कारखाने ज्यादा सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी १७९ साखर कारखाने सुरू होते या कारखान्यांनी या कालावधीत ३९ लाख टन साखरनिर्मिती केली होती. यंदा १८९ कारखाने सुरू झाले आहेत. त्यांच्यामार्फत ४५ लाख टन साखर तयार झाली.

डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत विविध ठिकाणी झालेल्या पावसाने गळीत हंगामात अडथळे निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर पाऊस थांबल्याने डिसेंबरच्या उत्तरार्धात मात्र साखर हंगामाने चांगलीच गती पकडली. कोल्हापूरसारख्या विभागांमध्ये साखर उताराही वाढल्याने साखरेचे उत्पादन गतीने झाल्याचे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

 यंदाच्या हंगामात नोव्हेंबर २०२१ पर्यंत एकूण साखरेची विक्री सुमारे ४७.५० लाख टन होती. सरकारने या कालावधीपर्यंत ४६.५० लाख टनांचा कोटा दिला होता. सरकारने सप्टेंबरच्या साखर विक्रीचा कालावधी ऑक्टोबर पर्यंत वाढवला होता. आता डिसेंबरचा कालावधीही जानेवारीपर्यंत वाढवला आहे. यामुळे एका महिन्याच्या कोट्याची साखर दोन महिन्यापर्यंत विकता येणार आहे.

अन्य राज्यांतील 
साखर उत्पादन असे 
(लाख टन)
    कर्नाटक      २५ 
    तमिळनाडू      ०.९२
    बिहार      १.९४
    हरियाना      १.७४
    उत्तराखंड      १.२३

 


इतर अॅग्रोमनी
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
शेतमालाची निर्यात गाठणार ५० अब्ज...२०२२ या आर्थिक वर्षात भारतीय शेतमाल निर्यात (...
सोयाबीनः सावध, ऐका पुढल्या हाका जगाची लोकसंख्या २०५० साली १० अब्ज...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
कापूस वायदा सरकारी रडारवरदेशात ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत एकंदर नऊ कृषी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
cotton market: पांढरं सोनं उद्योगाच्या... पुणे ः कापसाचे दर वाढल्याची हाकाटी पिटत कापड...
कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक १...देशभरातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट...
हळद दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडेनागपूर : लांबलेला पावसाळा, त्यामुळे शिवारात...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
साखर उत्पादनाची शतकी मजलकोल्हापूर : देशात यंदाचा साखर हंगाम सुरू...
हरभऱ्याची भिस्त नाफेडच्या खरेदीवरकमी मागणी, आयातीमुळे हरभरा दर दबावात पुणे -...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
देशातील तूर उत्पादनात मोठी घटपुणे : देशात तूर पिकाला यंदा सततचा पाऊस, मर रोग,...
खर्चात बचत हाच नफ्याचा पायानांदेड शहरापासून ३० किलोमीटरवरील दापशेड (ता. लोहा...
बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढपुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली...
कापूस आवक वाढूनही दर स्थिरावले जळगाव ः  कापड उद्योगातील वाढती महागाई व...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील...
सोयाबीन दरात सुधारणा पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा...