agriculture news in marathi Certificate of Outstanding Farmers in Nanded | Page 2 ||| Agrowon

नांदेडमध्ये थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना सन्मानपत्र

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

नांदेडमध्ये : कृषी पंपाच्या वीज थकबाकीतून दिलासा देत शेतकऱ्यांना थेट ६६ टक्क्यांची सवलत देण्यासाठी महावितरणच्या कृषी ऊर्जा पर्वाची सुरवात नांदेड परिमंडळात झाली आहे.

नांदेडमध्ये : ‘‘कृषी पंपाच्या वीज थकबाकीतून दिलासा देत शेतकऱ्यांना थेट ६६ टक्क्यांची सवलत देण्यासाठी महावितरणच्या कृषी ऊर्जा पर्वाची सुरवात नांदेड परिमंडळात झाली आहे. जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन या प्रसंगी सत्कार करण्यात आला. 

विद्युत भवन येथे मंगळवारी (ता.२ ) झालेल्या कृषी ऊर्जा पर्व सन्मान सोहळ्यात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार १ मार्च ते १४ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत विविध उपाययोजनांद्वारे कृषी ऊर्जा पर्व राबविण्यात येईल.  

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रेय पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली व अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आठ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कृषिपंपाची संपूर्ण थकबाकी भरलेले थेरबन येथील शंकर चालींदरवार, उंचेगावचे मारुतीराव शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, कवठा येथील माणिक धुमाळ आदींचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महिलादिनी सन्मान 

कृषी ऊर्जा पर्वाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने येत्या ४५ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. आठ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून महिला शेतकऱ्यांनी थकबाकी भरून महावितरणला साथ दिली. अशा महिलांचा उपविभागनिहाय सत्कार केला जाईल.  

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप थकबाकी भरली नाही, त्यांनी पुढे येऊन महावितरणला साथ द्यावी. ज्यांना त्वरित वीजजोडणी हवी आहे, अशा शेतकऱ्यांनी जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज करावा.

- दत्तात्रेय पडळकर, मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ.


इतर बातम्या
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...