प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले, पुरस्काराची रक्कम अद्याप बाकी

पीक स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरलेल्या शेतकऱ्यांना ‘कृषिदिनी’ प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. परंतु या शेतकऱ्यांना अजून जाहीर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठीची पुरस्काराची रक्कम मात्र खात्यावर मिळण्याची प्रतीक्षा आहे.
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले, पुरस्काराची रक्कम अद्याप बाकी
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले, पुरस्काराची रक्कम अद्याप बाकी

औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित करण्यात आलेल्या पीक स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरलेल्या शेतकऱ्यांना ‘कृषिदिनी’ प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. परंतु या शेतकऱ्यांना अजून जाहीर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठीची पुरस्काराची रक्कम मात्र खात्यावर मिळण्याची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी यासाठी राज्यात विविध हंगामांत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी रब्बी हंगामात तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर पीक स्पर्धा आयोजित केली गेली होती.  

या संदर्भात पीक स्पर्धेतील शेतकरी जेव्हा विचारणा करतात तेव्हा वरूनच पैसे आले नाही, आले की रक्कम खात्यावर मिळेल, असे उत्तर संबंधितांकडून मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. जाहीर पुरस्कार रक्कम वितरित करण्याला होणारा विलंब पाहता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून जर शासन अशा पीक स्पर्धा घेत असेल, तर त्याअंतर्गत पुरस्काराची रक्कम तत्काळ प्रभावाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करायला नको का, असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शासन व प्रशासनातील यंत्रणा याविषयी आता किती तत्परतेने पावले उचलतात याकडे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधी तीनशे रुपये शुल्क जमा करणाऱ्या सर्व विजेत्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमात गौरविले. परंतु पुरस्काराची रक्कम मात्र अजून खात्यावर मिळाली नाही. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जाहीर पुरस्काराची रक्कम वेळीच शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळायला नको का? - विलास भेरे, शेतकरी, रब्बी पीक स्पर्धेत विभाग स्तर विजेते

विभाग स्तरावरील पुरस्काराची रक्कम मात्र अजून खात्यावर मिळाली नाही. पुरस्काराची रक्कम वेळेवर द्यायला पाहिजे. - सुंदरराव आगलावे,  शेतकरी, विभाग स्तरावरील विजेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com