Agriculture news in Marathi Certificates, shawls, coconuts received, prize money still outstanding | Page 2 ||| Agrowon

प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले, पुरस्काराची रक्कम अद्याप बाकी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

पीक स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरलेल्या शेतकऱ्यांना ‘कृषिदिनी’ प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. परंतु या शेतकऱ्यांना अजून जाहीर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठीची पुरस्काराची रक्कम मात्र खात्यावर मिळण्याची प्रतीक्षा आहे.

औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित करण्यात आलेल्या पीक स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरलेल्या शेतकऱ्यांना ‘कृषिदिनी’ प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. परंतु या शेतकऱ्यांना अजून जाहीर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठीची पुरस्काराची रक्कम मात्र खात्यावर मिळण्याची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी यासाठी राज्यात विविध हंगामांत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी रब्बी हंगामात तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर पीक स्पर्धा आयोजित केली गेली होती.  

या संदर्भात पीक स्पर्धेतील शेतकरी जेव्हा विचारणा करतात तेव्हा वरूनच पैसे आले नाही, आले की रक्कम खात्यावर मिळेल, असे उत्तर संबंधितांकडून मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. जाहीर पुरस्कार रक्कम वितरित करण्याला होणारा विलंब पाहता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून जर शासन अशा पीक स्पर्धा घेत असेल, तर त्याअंतर्गत पुरस्काराची रक्कम तत्काळ प्रभावाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करायला नको का, असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शासन व प्रशासनातील यंत्रणा याविषयी आता किती तत्परतेने पावले उचलतात याकडे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधी तीनशे रुपये शुल्क जमा करणाऱ्या सर्व विजेत्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमात गौरविले. परंतु पुरस्काराची रक्कम मात्र अजून खात्यावर मिळाली नाही. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जाहीर पुरस्काराची रक्कम वेळीच शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळायला नको का?
- विलास भेरे, शेतकरी, रब्बी पीक स्पर्धेत विभाग स्तर विजेते

विभाग स्तरावरील पुरस्काराची रक्कम मात्र अजून खात्यावर मिळाली नाही. पुरस्काराची रक्कम वेळेवर द्यायला पाहिजे.
- सुंदरराव आगलावे,  शेतकरी, विभाग स्तरावरील विजेते


इतर बातम्या
परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन काढणी...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन...
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...