रब्बीतील ३ हजार ८७३ हेक्टरवरील बीजोत्पादनाचे प्रमाणीकरण
रब्बीतील ३ हजार ८७३ हेक्टरवरील बीजोत्पादनाचे प्रमाणीकरण

परभणी ः रब्बीतील ३८७३ हेक्टरवरील बीजोत्पादनाचे प्रमाणीकरण

परभणी ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात परभणी येथील विभागीय बीज प्रमाणीकरण कार्यालयांतर्गच्या परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील २ हजार ७७ शेतकऱ्यांच्या ३ हजार ८७३  हेक्टरवर क्षेत्रावरील बीजोत्पादन कार्यक्रमाचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यापासून ५९ हजार १९ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात या चार जिल्ह्यांतील २ हजार ४४५ शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, कांदा या पिकांच्या पायाभूत आणि प्रमाणित बियाण्यांचा मिळून एकूण ४ हजार ४०४.४० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रमाची नोंदणी विभागीय बीज प्रमाणीकरण कार्यालयाकडे केली होती.

यामध्ये १३१ शेतकऱ्यांनी २०८.४ हेक्टरवर घेतलेले पायाभूत बीजोत्पादन आणि २ हजार ३१४ शेतकऱ्यांनी ४ हजार १९६ हेक्टवर घेतलेल्या प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रमाचा समावेश होता. विविध कारणांनी पायाभूत ३६८ शेतकऱ्यांच्या ६३१ हेक्टरवरील बीजोत्पादन कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे अंतिमतः २ हजार ७७ शेतकऱ्यांच्या ३ हजार ८७३ हेक्टरवरील बीजोत्पादन कार्यक्रमाचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

बीजोत्पादन कार्यक्रमातून एकूण ५९ हजार १९ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. प्रमाणीकरण करण्यात आलेल्यांमध्ये १३४ शेतकऱ्यांच्या २०७ हेक्टरवरील ज्वारीचा समावेश असून, त्यापासून २ हजार ५१६ क्विंटल बीजोत्पादन अपेक्षित आहे. ५५ शेतकऱ्यांच्या १०४.८०  हेक्टरवरील गव्हाच्या बीजोत्पादन कार्यक्रमाचे प्रमाणीकरण करण्यात आले असून, त्यापासून ३ हजार ४७३ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. 

एक हजार ८२९ शेतकऱ्यांनी ३ हजार ४६३ हेक्टवरील हरभरा बीजोत्पादन घेतले असून, त्यापासून ५२ हजार ६२२ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. ५९ शेतकऱ्यांनी ९८.२० हेक्टरवर करडईचे बीजोत्पादन घेतले असून, त्यापासून ४०८ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी विभागातील प्रमाणीकरण झालेले पीकनिहाय बिजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
पीक शेतकरी संख्या प्रमाणीकरण क्षेत्र अपेक्षित बिजोत्पादन क्विंटल 
ज्वारी १३४ २०७ २५१६ 
गहू ५५ १०४.८० ३४७३ 
हरभरा १८२९ ३४६३ ५२६२२ 
करडई ५९ ९८.२० ४०८
जिल्हानिहाय शेतकरी संख्या बीज प्रमाणीकरण क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
जिल्हा शेतकरी संख्या प्रमाणीकरण क्षेत्र 
परभणी १२३४ २१७२.८० 
नांदेड १९६ ३५७.४० 
लातूर ३३३ ७५२.६० 
उस्मानाबाद ३१४ ५८६.९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com