नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प

फळे, भाजीपाला
फळे, भाजीपाला

पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाअभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने राज्यात ‘शेतमालाच्या मूल्यवर्धनसाठी ॲग्रीबिझनेस नेटवर्क’ (मॅग्नेट) हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आशियाई विकास बॅंकेच्या आर्थिक सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, यामध्ये प्रामुख्याने केळी, डाळिंब, सीताफळ, संत्रा, मोसंबी, पेरू, चिक्कू, स्ट्रॉबेरी, भेंडी, हिरवी व लाल मिरची यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी दिली.   आशियाई विकास बॅंकेचे अधिकारी आणि प्रकल्प समन्वयक मासाहीरो निशीमुरा, नैसर्गिक संसाधने व कृषी तज्ञ श्रीमती सुने किम, प्रकल्प अधिकारी क्रिशनसिंग रौटेला आणि कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. यामध्ये मोहाडी (जि. नाशिक) इंदापुर (जि. पुणे) कंदर व अकलुज (जि. सोलापूर) येथील निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, निर्यातदार व पायाभूत सुविधांची भेटी देऊन पाहणी केली.  या भेटी आणि पाहणी दरम्यान आलेल्या मुद्द्यांची माहिती शिंदे यांनी दिली. या वेळी ते म्हणाले, ‘‘फलोत्पादन पिकांच्या काढणीपूर्व उत्पादन पद्धती व काढणीपश्चात हाताळणी तंत्रज्ञानाचा अभाव थेट शेतांवर जाणवला. या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना उपक्रम हाती घ्यावयाचे याबाबत माहीती घेतली. तसेच विविध पिकांची स्थानिक परिस्थिती व भविष्यातील विपणनाच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी विचारात घेउन प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.’’ तसेच या आराखड्यानुसार राज्यातील फळे व भाजीपाला पिकांच्या मूल्य साखळ्यांमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे, मागणीनुसार मूल्यवृद्धी, अन्न वितरणाची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, संस्था यांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढविण्यात येणार आहे. यासाठी मूल्यसाखळीशी संबंधीत घटकांची क्षमता बांधणी, समाविष्ट पिकांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान अद्ययावत करणे, पायाभूत सुविधांची उभारणी व अाधुनिकीकरण तसेच खरेदीदार-विक्रेता साखळी मजबुत करणे आदी विविध बाबींचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. या पिकांसाठी करण्यात येणार मूल्यवर्धन साखळी  केळी, डाळिंब, सीताफळ, संत्रा, मोसंबी, पेरू, चिक्कू, स्ट्रॉबेरी, भेंडी, हिरवी व लाल मिरची.

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नोंदणीसाठी संपर्क  रत्नागिरी (०२३५२) २२८३७७, कोल्हापूर (०२३१)२६५०१६६,  पुणे (०२०) २४२६१२५१, नाशिक - (०२५३)२५१२१७६,  औरंगाबाद (०९४२२३४६९७१), लातुर (०९८६७८९१५३४)  अमरावती (०७२१) २५७३५३७, नागपूर (०७१२) २७२२९९७.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com