औरंगाबाद जिल्हा परिषदेत कृषी, पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदी एल. जी. गायकवाड

Chairman of Agriculture, Animal Husbandry Committee L. G. Gaikwad in Aurangabad Zilla Parishad
Chairman of Agriculture, Animal Husbandry Committee L. G. Gaikwad in Aurangabad Zilla Parishad

औरंगाबाद : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. १०) झाली. त्यात तीन विषय समित्यांच्या सभापतींना खातेवाटप करण्यात आले. विविध विषय समित्यांच्या रिक्‍त झालेल्या सदस्यांच्या जागांवर सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती किशोर बलांडे यांना वित्त व बांधकाम, अविनाश गलांडे यांना शिक्षण व आरोग्य, तर एल. जी. गायकवाड यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदाचा कार्यभार देण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या सभापतींना खातेवाटप व विषय समिती सदस्य निवडीसाठी गेल्या आठवड्यात विशेष सभा आयोजित करण्यात आली. मात्र स्थायी समितीच्या रिक्‍त जागांसाठी माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह माजी सभापतींनीही अर्ज दाखल केले. त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली होती. सोमवारी पुन्हा ही सभा झाली. सुरुवातीला सभापतींना खातेवाटप करण्याचा ठराव रमेश गायकवाड यांनी मांडला. त्याला केशव तायडे यांनी अनुमोदन दिले. 

स्थायी समितीच्या तीन रिक्‍त जागांसाठी सातजणांनी अर्ज दाखल केले होते. तथापि, माजी अध्यक्ष देवयानी डोणगावकर, माजी सभापती विलास भुमरे, विजय चव्हाण यांनी अर्ज मागे घेतले. तर अक्षय जायभाये दोन समित्यांवर असल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. यामुळे मैदानात राहिलेले केशवराव तायडे, शिवाजी पाथ्रीकर, रमेश पवार या तिघांची बिनविरोध निवड झाली. 

वित्त समिती सदस्यांसाठी हिंदवी खंडागळे व शिल्पा कापसे यांनी दाखल केलेले अर्ज मागे घेतले. त्यामुळे त्या जागा रिक्त राहिल्या. शिक्षण समितीसाठी शिल्पा कापसे व रेणुका जाधव यांचे अर्ज राहिली. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. सविता केरे, छाया घोगरे, कल्पना जामकर यांची पशुसंवर्धन, तर कृषी समितीवर सीना मिसाळ, गणेश आधाने व रुस्तुमबी पठाण यांची निवड झाल्याचे अध्यक्ष मीना शेळके यांनी जाहीर केले. 

सदस्यांनी समयसूचकता दाखविल्यामुळेच निवडणूक न होता सदस्यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे काही सदस्यांनी विरोधही केला. परंतु या वेळी ज्येष्ठ सदस्यांची मध्यस्थी कामी येऊन त्यांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया टळली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com