अध्यक्षांसह दोन संचालक कारागृहात

अध्यक्षांसह दोन संचालक कारागृहात
अध्यक्षांसह दोन संचालक कारागृहात

धान्य खरेदीत अपहार प्रकरण वाशीम : शेतमाल खरेदीत अनियमितता करण्याचा ठपका असलेल्या येथील खरेदी-विक्री संस्थेच्या अध्यक्षांसह दोन संचालकांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात अाली अाहे. संचालकांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी (ता.३) न्यायालयात सुनावणी होणार असून, सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या याकडे नजरा लागल्या अाहेत.  खरेदी-विक्रीत धान्य खरेदीत एक कोटी ३८ लाखांच्या अपहार प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण संचालक मंडळ व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे. १५ संचालकांपैकी दोन संचालक व अध्यक्षांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले असून, या तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी (ता.१) संपल्याने, त्यांना जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात अाले होते. या वेळी न्यायालयाने या तिघांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या तिघांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. याआधी संचालकांनी केलेल्या अटकपूर्व जामिनावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील चार ट्रक माल चोरून नेल्याची नोंद असलेला मुख्य संचालक आरोपी अद्यापही पोलिसांना गवसलेला नाही. तसेच, उर्वरित संचालकांनाही अटक झालेली नाही.  वाशीम खरेदी -विक्री संस्थेत शेतकऱ्यांना फसवून ऑनलाइनच्या नावाखाली ऑफलाइन तूर व हरभरा खरेदी करून त्यातील चार ट्रक शेतमाल अकोला येथे विकण्यात अाला. एक कोटी ३८ लाखांचा हा अपहार आहे. या प्रकरणात तब्बल २१५ दिवसांनंतर प्रशासनाने पुढाकार घेतला आणि पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष वामन संपत महाले यांना पोलिसांनी २५ डिसेंबरला ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २७ डिसेंबरला रूपेश वऱ्हाडे व विनोद पट्टेबहादूर या दोन संचालकांना अटक करण्यात अाली होती. न्यायालयाने या तिघांची पोलिस कोठडीत रवानगी केली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी  त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात अाले.  सूत्रधार गायबच या प्रकरणामध्ये सात संचालक गेल्या नऊ महिन्यांपासून घोटाळा होत असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांपासून ते उपनिबंधकांपर्यंत सर्वच अधिकाऱ्यांना निवेदने देत होते. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहण्यात अाले नाही. आता हे प्रकरण समोर अाल्याने या सात संचालकांच्या पाठपुराव्यावर शिक्कामोर्तब झाले. अाता सर्वच संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले असल्याने ज्यांचा दोष नाही, असेही अारोपी बनविण्यात अाल्याची चर्चा होत अाहे. चोर सोडून संन्याशाला फाशी, असा प्रकार होऊ लागला अाहे.   शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यांचा प्रश्न कायमच येथील केंद्रावर शेतमाल विक्री करणाऱ्या अनेकांना चुकारे मिळालेले नाहीत. वरील घोळ समोर अाल्याने पुढे प्रकरणाचा छडा लागेलही मात्र ज्यांनी शेतमाल विक्री केला व चुकारे मिळाले नाही, अशांबाबत तातडीने पुढील ठोस कारवाई होण्याची गरज व्यक्त होऊ लागली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com