सभापती अपर्णा खोसकर यांना अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक

सभापती अपर्णा खोसकर यांना  अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक
सभापती अपर्णा खोसकर यांना अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक

नाशिक : पोषण आहार अभियानाच्या पुरस्कारासंदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांना अंधारात ठेवल्याच्या आणि त्या अनुषंगाने अपमानास्पद वागणूक देण्याच्या मुद्यावरून सर्वसाधारण सभेत महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जमिनीवर बसून चर्चा करत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांना जाब विचारला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज झाले. पोषण आहार अभियानात जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळाल्याबद्दल खोसकर यांना माहिती का दिली नाही, अशी विचारणा करून सदस्य उदय जाधव यांनी खुलासा करण्याची मागणी केली. उपाध्यक्षा नयना गावित यांनी महिला सभापतींना मान मिळत नाही, असे सांगून निषेध व्यक्त केला. आसन सोडून त्या व्यासपीठासमोर जमिनीवर येऊन बसल्या. पाठोपाठ खोसकर, बांधकाम समिती सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर याही जमिनीवर येऊन बसल्या. सदस्य भास्कर गावित यांनी आदिवासी सभापतींवर अन्याय करणे चूक असल्याचे सांगितले.

मुंडे यांच्याकडून वारंवार अपमान केला जात असल्याचा आरोप खोसकर यांनी केला. यावेळी सर्वच सदस्यांनी मुंडे यांचा निषेध केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी खुलासा करावा म्हणून सदस्यांनी मागणी केली. एक वर्ष अधिकाऱ्यांचा उर्मटपणा खपवून घेतला. यापुढे नाही, असा इशारा त्यांनी दिला. मुंडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याच्या अविर्भावात वागतात. त्यांची भाषा योग्य नाही, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी जाधव यांनी केली. सांगळे यांनीही ठोस कारवाई होणार म्हणून स्पष्ट केले. आपण दूरध्वनी केल्याचे मुंडे यांनी सांगितले. नयना गावित यांनी चूक झाली म्हणून मान्य करा, असे फर्मावले. सदस्य नीलेश केदार यांनी मुंडे यांना सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी केली. यावेळी सभागृहातील वातावरण तप्त झाले होते. हे पाहून मुंडे यांनी माफी मागत यापुढे दक्षता घेईल, असे आश्‍वासन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com