agriculture news in Marathi, Chairman of the Jalgaon Market Committee will decide the ballot box | Agrowon

जळगाव बाजार समितीत लोकसभेची मतपेटी ठरविणार सभापती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

जळगाव : जिल्ह्यात सर्वांत मोठ्या व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतिपदासाठी रस्सीखेच आहे. सत्तेच्या चाव्या शिवसेना समर्थककांकडे असून, सेना नेतृत्वाकडून निष्ठावंतास संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. त्यात माजी उपसभापती कैलास चौधरी, भरत बोरसे व अनिल भोळे यांच्यात सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु शेवटी लोकसभा निवडणुकीसंबंधीच्या मतमोजणीत इच्छुकांच्या गावात भाजपला किती मते मिळतील, यावरही सभापतिपदाची संधी बहाल करण्याचा पवित्रा नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. 

जळगाव : जिल्ह्यात सर्वांत मोठ्या व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतिपदासाठी रस्सीखेच आहे. सत्तेच्या चाव्या शिवसेना समर्थककांकडे असून, सेना नेतृत्वाकडून निष्ठावंतास संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. त्यात माजी उपसभापती कैलास चौधरी, भरत बोरसे व अनिल भोळे यांच्यात सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु शेवटी लोकसभा निवडणुकीसंबंधीच्या मतमोजणीत इच्छुकांच्या गावात भाजपला किती मते मिळतील, यावरही सभापतिपदाची संधी बहाल करण्याचा पवित्रा नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. 

कैलास चौधरी हे खेडी खुर्द येथील आहे. भरत बोरसे हे भादली खुर्दचे असून, अनिल भोळे हे वावडदा (ता.जळगाव) येथील सोसायटीच्या माध्यमातून तालुक्‍याच्या राजकारणात आले आहे. अर्थातच या इच्छुकांच्या गावात भाजपा उमेदवार उन्मेष पाटील किंवा भाजपला किती मते मिळतील, यानंतर सभापतिपदासंबंधी सेना व भाजप नेते ठोस निर्णय जाहीर करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सभापती निवडीसंबंधी २७ मे (सोमवारी) रोजी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी आहे. सभापती निवडीपूर्वी लोकसभेचा निकाल हाती येणार असल्याने निवडीबाबत उत्सुकता आहे. 

अनिल भोळे हे माजी सभापती लक्ष्मण पाटील यांच्या पॅनेलच्या माध्यमातून बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आले होते. ते मूळचे साळवा येथील आहे. तर भरत बोरसे शिवसेना समर्थक असून, सलग चार वेळेस ते निवडून आले आहे. सुरेश जैन यांच्या नेतृत्वात त्यांना एकदा सभापतिपदाची संधी मिळाली आहे. तर कैलास चौधरी हे शिवसेना नेते सुरेश जैन व गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत मानले जातात. चौधरी हे जिल्हा बॅंकेतील पीकविमाप्रश्‍नाचे आंदोलन आणि केळीची इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर मोजणी या मुद्यांच्या पाठपुराव्यासह आंदोलनासंबंधी जिल्हाभर चर्चेत आले होते.

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...