agriculture news in marathi, chairman of market committees give hint for agitation, yavatmal, maharashtra | Agrowon

बाजार समित्या बरखास्तीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करू : सभापतींचा इशारा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

यवतमाळ  : बाजार समित्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. आता या बाजार समित्याच बरखास्त करण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. हा शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट आहे. याविरोधात राज्यभरात आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल, असा इशारा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सभापतींनी दिला.

यवतमाळ  : बाजार समित्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. आता या बाजार समित्याच बरखास्त करण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. हा शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट आहे. याविरोधात राज्यभरात आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल, असा इशारा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सभापतींनी दिला.

जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी एकत्र येत केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात विरोध दर्शविला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पत्र दिले. देशभरातील बाजार समित्या बरखास्त करून ई-नाम प्रणाली वापराचा उल्लेख करण्यात आला. ही प्रणाली बाजार समित्या कायम ठेऊनही राबविता येते. मात्र केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत व्यापाऱ्यांनाच आधार दिला आहे.उद्या व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे पैसे दिले नाहीत, काट्यात हेराफेरी केली तर कोण जबाबदार राहणार, अशा घटना घडल्या तर शेतकऱ्यांना कोण न्याय देणार, ई-नाम प्रणाली सर्वच शेतकऱ्यांना हाताळता येईल काय आदी प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आले. त्यामुळे याविरोधात राज्यभरात आंदोलन उभे केले जाणार आहे. केंद्र शासनालाही निवेदन दिले जाणार आहे, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

या वेळी कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, राळेगाव बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, आर्णी बाजार समितीचे सभापती राजू पाटील, उमरखेड बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे, मारेगाव बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, नेर बाजार समितीचे नरेंद्र राऊत, यवतमाळ बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, नरेंद्र कोंबे, कापूस पणन महासंघ संचालक सुरेश चिंचोळकर, सुदाम पवार, वसंत आसुटकर, रवींद्र धानोरकर आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला (कापूस, तूर, रब्बी ज्वारी,...मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते ढगाळ...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक...मागील दोन वर्षांपासून ज्वारी, मका पिकांवर अमेरिकन...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शाळा, कॉलेजची आज वाजणार घंटा सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
वीजबिल थकबाकीमुळे ताकारी सिंचन योजनेत...सांगली ः कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव तालुक्ं‍...
काकडी तोडणीलाही महागसिन्नर, जि. नाशिक : जिल्ह्यात भाजीपाला उत्पादन...
‘खासगी’पेक्षा ‘सहकारी’च गोडसोमेश्वरनगर, जि. पुणे ः सरलेल्या २०१९-२० या...
बुलडाणा महावितरणला साडेदहा हजार लिटर...बुलडाणा (प्रतिनिधी) : केवळ ऑइल नसल्या कारणाने...
ढगाळ वातावरणामुळे तुरीवर किडींचा...शिरपूर जैन (जिल्हा वाशीम) : मागील दोन-तीन...
सौरऊर्जेवरील कृषी पंपापासून शेतकरी वंचितअमरावती  : पारंपरिक नसेल तर सौरऊर्जेच्या...
साखर हंगामाच्या प्रारंभीच ऊसतोडणी...कोल्हापूर : ऑक्‍टोबरच्या जोरदार पावसाने...
ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या...सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून...
परभणी, हिंगोलीत कापूस खरेदी सुरूपरभणी  : यंदाच्या खरेदी हंगामात आधारभूत...
‘ती’ गुलाबी बोंडअळी नसून बोंडसडनांदेड  : माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे...
औरंगाबाद : मका, कापूस खरेदी केंद्र सुरू...औरंगाबाद : मका व कापूस खरेदीची शासकीय खरेदी...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची २४...अकोला  : या हंगामात अतिवृष्टी व आलेल्या...