Agriculture news in marathi Chaitri Yatra will also be held in a symbolic manner this year | Page 2 ||| Agrowon

चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक स्वरूपात होणार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 एप्रिल 2021

पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने आषाढी प्रमाणेच चैत्री यात्राही प्रतिकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. 

सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने आषाढी प्रमाणेच चैत्री यात्राही प्रतिकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. 

चैत्री यात्रेसंदर्भात मंदिर समितीच्या औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाइन बैठक झाली. या वर्षी चैत्री यात्रेचा सोहळा १७ ते २७ एप्रिलदरम्यान होणार आहे. चैत्री यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे कामदा एकादशी २३ एप्रिल रोजी आहे. पण कोरोनामुळे ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच संचारबंदीही घोषित केली आहे. त्यामुळे सध्या मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. 

आता पुढे यात्रा कालावधीतही मंदिर बंद राहणार आहे. या काळात श्रींचे नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. तर चैत्री यात्रेतील परंपरा जोपसण्यासाठी २३ एप्रिलला मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांद्वारे प्रतिकात्मक व मर्यादित स्वरूपात महापूजा व अन्य धार्मिक विधी होतील, असे औसेकर महाराज म्हणाले. या बैठकीला कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम आदी उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला...
हरभरा दर पाच हजारांवर अकोला ः यंदा हरभऱ्याचा दर शासनाने जाहीर केलेल्या...
साठ कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने घेतला...पुणे ः कोविड १९ साथीच्या तडाख्यात सापडल्याने कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
अन्न प्रक्रियेसाठी ‘थ्री डी प्रिंटिंग’...सर्वसामान्यपणे आपल्याला विविध आकारातील कुकीज,...
मराठवाडा, विदर्भात पाऊस वाढण्याची...पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
कापूस बियाणे विक्री एक जूनपासून पुणे ः राज्यात कापूस बियाणे विक्रीवर यंदा देखील...
कारखान्यांकडून इथेनॉलचे ३०२ कोटी  लिटर...कोल्हापूर : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल कंपन्या...
मोहफुलांवरील दारूबंदी कायद्याचे निर्बंध...पुणे ः मोहफुलांच्या प्रक्रिया उद्योगातून आदिवासी...
तुरळक ठिकाणी हलक्या सरी पुणे : पूर्वमोसमी पावसाचा काहीसा प्रभाव कमी झाला...
बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिरावले अकोला ः यंदा तुरीचे उत्पादन कमी झाले. शिवाय...
ठिकठिकाणी गारपीट, पावसाचा दणका पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात...
साखर उद्योगाकडून २५ ऑक्सिजन प्रकल्पपुणेः कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयावह साथीचा...
गुरुवारपासून पाऊस वाढणार पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गेल्या...
दोन हजार कोटींचा बेदाणा शीतगृहात पडून सांगली ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सांगली-...
दर्जेदार आंब्याला मिळवले बांधावरच ग्राहकपुनर्वसित ठिकाणी मिळालेल्या शेतजमिनी ओसाड...