Agriculture news in marathi Of Chakan animals 70 lakh market turnover | Agrowon

चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची उलाढाल

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

चाकण बाजार आवारात लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदा जनावरांचा बैल, गायी, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदींचा बाजार भरला. या बाजारात दीडशे बैल विक्रीसाठी आले होते. त्यातील नव्वद बैलांची विक्री झाली. एका बैलाला दहा ते पस्तीस हजार रुपये भाव मिळाला.

चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदा जनावरांचा बैल, गायी, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदींचा बाजार भरला. या बाजारात दीडशे बैल विक्रीसाठी आले होते. त्यातील नव्वद बैलांची विक्री झाली. एका बैलाला दहा ते पस्तीस हजार रुपये भाव मिळाला. सुमारे सात हजार शेळ्या, मेंढ्यांची आवक झाली त्यातील साडेपाच हजार शेळ्या, मेंढ्यांची विक्री झाली. बाजारात सुमारे सत्तर लाखांची उलाढाल झाली, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

कोरोनाच्या साथीत गेल्या वर्षभरापासून जनावरांचा आठवडे बाजार बंद होता. त्यामुळे शेतकरी, जनावरांची खरेदी, विक्री करणारे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. चाकण येथील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात अगदी कर्नाटक राज्यातून बैल विकण्यासाठी व्यापारी येत असतात.

तसेच राज्यातील कोकणभाग, पंढरपूर आदी भागातून बैल खरेदी, विक्री करण्यासाठी शेतकरी, व्यापारी येतात. सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाल्याने बैलांना मागणी वाढली आहे, तसेच भावही वाढले आहेत. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर हा पहिला बाजार असल्याने शेतकरी, व्यापारी यांनी गर्दी केली होती. परंतु बाजार समितीने कोरोनाचे नियम पाळून गर्दीवर नियंत्रण ठेवले जात असल्याचे सभापती घुमटकर यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...