छावा क्रांतिवीर सेनेकडून चक्का जाम ओल्या दुष्काळासह नुकसानभरपाईची मागणी

छावा क्रांतिवीर सेनेकडून चक्का जाम
छावा क्रांतिवीर सेनेकडून चक्का जाम

नाशिक  : जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई, संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी व विद्यालयीन, महाविद्यालयीन, उच्च महाविद्यालयीनपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण विनाशुल्क देण्यात यावे, या मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ५) छावा क्रांतिवीर सेनेच्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार योगेश शिंदे यांच्याकडे संघटनेच्या वतीने देण्यात आले.  खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. पिकांचे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये द्राक्ष, सोयाबीन, मका, कापूस, कडधान्ये आदी पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मका, बाजरी, ज्वारी आदींचा चारासुद्धा सडून गेल्यामुळे चाऱ्याचासुद्धा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. पिकांना कोंब फुटले आहेत. कांदा पिकाचेसुद्धा नुकसान झाले आहे. कांद्याच्या रोपांसह शेतात लागवड केलेला कांदा सडू लागला आहे. भौगोलिक विस्तार व झालेले नुकसान पाहता पंचनामे करण्यासाठी वेळ कमी आहे. अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाई साठी १०० टक्के पंचनामे करावेत, असा ठराव विहित मार्गाने शासनाकडे मागविण्यात यावे. वेळेत पंचनामे व्हावेत, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे व भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी करण्यात आली.  ठोस भूमिका घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देऊन भविष्यात आकस्मिक संकटांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय द्यावा. पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे झाल्यास त्याला सर्वस्व शासन, प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असा विनंतीवजा इशारा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com