Agriculture news in marathi; Chakka jam from Chhava Revolutionary Army | Agrowon

छावा क्रांतिवीर सेनेकडून चक्का जाम ओल्या दुष्काळासह नुकसानभरपाईची मागणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नाशिक  : जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई, संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी व विद्यालयीन, महाविद्यालयीन, उच्च महाविद्यालयीनपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण विनाशुल्क देण्यात यावे, या मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ५) छावा क्रांतिवीर सेनेच्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार योगेश शिंदे यांच्याकडे संघटनेच्या वतीने देण्यात आले. 

नाशिक  : जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई, संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी व विद्यालयीन, महाविद्यालयीन, उच्च महाविद्यालयीनपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण विनाशुल्क देण्यात यावे, या मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ५) छावा क्रांतिवीर सेनेच्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार योगेश शिंदे यांच्याकडे संघटनेच्या वतीने देण्यात आले. 

खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. पिकांचे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये द्राक्ष, सोयाबीन, मका, कापूस, कडधान्ये आदी पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मका, बाजरी, ज्वारी आदींचा चारासुद्धा सडून गेल्यामुळे चाऱ्याचासुद्धा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. पिकांना कोंब फुटले आहेत. कांदा पिकाचेसुद्धा नुकसान झाले आहे.

कांद्याच्या रोपांसह शेतात लागवड केलेला कांदा सडू लागला आहे. भौगोलिक विस्तार व झालेले नुकसान पाहता पंचनामे करण्यासाठी वेळ कमी आहे. अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाई साठी १०० टक्के पंचनामे करावेत, असा ठराव विहित मार्गाने शासनाकडे मागविण्यात यावे. वेळेत पंचनामे व्हावेत, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे व भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी करण्यात आली. 

ठोस भूमिका घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देऊन भविष्यात आकस्मिक संकटांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय द्यावा. पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे झाल्यास त्याला सर्वस्व शासन, प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असा विनंतीवजा इशारा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आला. 


इतर बातम्या
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
अकोला : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन...अकोला ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
डॉ. सूर्या गुंजाळ यांना केद्राई जीवन...नाशिक  : जिल्ह्यातील नांदूर खुर्द (ता. निफाड...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
सांगलीत तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरूसांगली : नाफेड व स्टेट महाराष्ट्र स्टेट-को-ऑप....
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...