वीजबिल माफीसाठी उद्या चक्का जाम

लॉकडाउनमधील घरगुती वीजबिले माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्यात येणार आहे.
वीजबिल माफीसाठी उद्या चक्का जाम Chakka Jam tomorrow for electricity bill waiver
वीजबिल माफीसाठी उद्या चक्का जाम Chakka Jam tomorrow for electricity bill waiver

कोल्हापूर : लॉकडाउनमधील घरगुती वीजबिले माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.

शेट्टी म्हणाले, ‘‘गेल्या वर्षापासून लॉकडाउनच्या काळातील घरगुती वीजबिले माफ करा, अशी मागणी करीत आहोत. मात्र राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले सजवायला यांच्याकडे पैसे आहेत. मात्र वीजबिलात सवलत द्यायला पैसे नाहीत. लॉकडाउनची भीती घालून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमटतील.’’

कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पुलावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, सर्वपक्षीयांनी यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, आदिनाथ हेमगिरे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, संदीप कारंडे, विठ्ठल मोरे, शैलेश आडके, रमेश भोजकर, अविनाश मगदूम, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com