नाशिक जिल्ह्यात टँकरद्वारे जनावरे जागविण्याची धडपड

तालुक्याच्या पूर्व भागात जनावरे जगविण्याची कसरत सुरु आहे. प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. तातडीने मागणी होईल, त्या ठिकाणी चारा-पाण्याची व्यवस्था करून छावण्या सुरू कराव्यात. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल. - सुधीर जाधव, सरपंच, अनकाई
नाशिक जिल्ह्यात टँकरद्वारे जनावरे जागविण्याची धडपड
नाशिक जिल्ह्यात टँकरद्वारे जनावरे जागविण्याची धडपड

येवला : एक वेळ माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो, पण जनावरांना पाणी आणणार कुठून, अशी विवंचना करण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांसह येवल्यात उत्तर-पूर्व भागात ३ हजार रुपयांचा पाण्याचा टँकर विकत घेऊन जनावरांची तहान भागविण्याचे शर्तीचे प्रयत्न पशुपालक करत आहेत. प्रशासन छावण्या व जनावरांच्या पाण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील सुमारे १५ लाखावर जनावरांना या टंचाईचा फटका बसला आहे. त्यांच्या मालकांवर जीवाचा आकांत करून पाणी उपलब्ध करण्याची करण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात १० लाख ६ हजार गाई, २ लाख ३० हजार म्हैस, ५ लाख ७८ हजार शेळ्या व ३ लाख ५९ हजार मेंढ्या या पाळीव प्राण्यांची संख्या सुमारे २२ लाखांच्या आसपास आहे. सध्या सात तालुक्यांत किमान पिण्यापुरते पाणी आहे. पण येवला, मालेगाव, सिन्नर, नांदगाव, चांदवड आदी दुष्काळी तालुक्यात मात्र थेंबभर पाणी मिळवणे जिकरीचे झाले आहे. येवल्याच्या पूर्व भागातील चित्र अजूनच विदारक आहे. चाऱ्याबरोबरच पाणीही विकत घेण्याची वेळ येत आहे. 

उंदीरवाडी सारख्या छोट्या गावात २० ते ३० शेतकरी विकत पाणी घेऊन जनावरांची तहान भागवत आहेत. शेतकरी ७०० रुपयांचा छोटा किंवा तीन हजारांचा मोठा टँकर विकत घेऊन हे पाणी विहिरीत, शेततळ्यात साठवतात. या भागात काठेवाडी गाईवाले पशुपालक आहेत. त्यांनातर मिळेल तेथून पाणी आणून गाईंना पाजावे लागत आहे. त्यांना दिवसातून एकदाच पाणी पाजले जात आहे.

प्रशासन निवडणुकीत व्यस्त जिल्ह्यात टँकरग्रस्त गावांची संख्या हजाराकडे गेलीर यात जनावरांच्या पाण्याची तरतूद नसल्याने त्यांचे हाल आणखी बिकट आहेत. २०१३ मध्ये टंचाईत जिल्ह्यात टँकरने जनावरांना पाणी पुरवले. आता जनावरांसाठी टँकरने पाणी देण्याची मागणी आहे. मात्र प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. येवल्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी पशुपालकांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना साकडे घातले.

जिल्ह्यातील पशुधन

तालुका   गाई म्हैस  मेंढ्या शेळ्या
मालेगाव १००६२३ ३६४२५  ७६१५९  ८४८३०
बागलाण ९१८२७ २३८७३ ६०८०१ ७१३१८
कळवण ५७६७८ ९६३४ १५१६ ३९०३५
नांदगाव ७४५०७  ९०२५ ११४८६६ ४८३७५
सुरगाणा ३४५७७ २३८५१ ०  १९६९६
नाशिक ४६८२२  २८९३३ १०२२ १३६८६
दिंडोरी  ८८५१५ १०३७८ १४३७ ३०१९७
इगतपुरी ४४२९९ २२९११ ४० १९७५८
पेठ  ३४०८८  ७६३७ ०  ११४३९
निफाड ८५१६० १३०३०  ८६३० ४५३९०
सिन्नर   ९८८०९ ७७५५ ३५९१४ ५५३९२
येवला ८८५९० ९९७२   १८३७०    ४७३९२
चांदवड ७३२७८ ७६६५  ८०३७  ३६७२७
त्रंबकेश्वर ४७९८२ १३३६४ २४४३६
देवळा ३९८०६ ६३०८ ३२६२१ ४०६४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com