agriculture news in marathi The challenge for farmers is to sell vegetables in Kolhapur district | Agrowon

भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान; संचारबंदीमुळे अनंत अडचणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन नियमावलीअंतर्गत आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. अनेक गावांमध्ये गावातील प्रमुख ठिकाणी बसून शेतकरी भाजीपाला विक्री करत असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन नियमावलीअंतर्गत आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. अनेक गावांमध्ये गावातील प्रमुख ठिकाणी बसून शेतकरी भाजीपाला विक्री करत असल्याचे चित्र आहे. परंतु संचारबंदीमुळे आवश्‍यक त्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत नसल्याने त्याचा भाजीपाला विक्रीवरही पडत आहे. काढलेला भाजीपाला विकण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.

लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी ग्रामीण भागात सुरक्षित अंतर ठेवून आठवडी बाजार सुरु होते. निर्बंध कडक करण्याचे ठरल्यानंतर ग्रामपंचायतींनी मास्क सक्तीचे करीत बाजारावर परिणाम होवू दिला नव्हता. परंतु ही नियमावली जाहीर झाल्यानंतर मात्र आठवडी बाजारावर परिणाम झाला आहे. प्रत्येक गावात स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जात आहेत.

शहरी भागातील बाजारसमित्या, बाजारपेठेत सौदे सुरु असल्याने गावातही बाजार सुरु करावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. पण संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने ग्रामपंचायतीनी सावध पवित्रा घेतला आहे. यामुळे लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी जागा मिळेल त्या ठिकाणी बसून शेतकऱ्यांनी किरकोळ प्रमाणात भाजीपाला विक्री केली. अद्याप लॉकडाऊनचा कालावधी जादा असल्याने आता पुढील पंधरा दिवसांचे नियोजन कसे करायचे या चिंतेत भाजीपाला उत्पादक आहेत.

प्रतिक्रिया..
जर ग्राहकांनी पुरेशी खरेदी केली नाही तर अतिरिक्त भाजीपाला होऊन दर घसरू शकतात. याउलट निर्बंध कडक केले तर भाजीपाल्याची काढणी कमी होऊन चणचण निर्माण होवू शकते. सध्या तरी पुढील दिवसांत शासनाने बाजाराबाबत काय धोरण जाहीर होइल व त्याची अंमलबजावणी ग्रामस्तरावर कशी होइल याबाबत नक्की सांगता नाही. भाजीपाल्याची दररोज किती काढणी करायची याबाबत नेमका अंदाज आम्हाला येत नाही. यामुळे नुकसान होण्याची शक्‍यता जादा आहे.
- अप्पासाहेब पाटील, 
मौजे सांगाव, जि. कोल्हापूर

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...