agriculture news in marathi The challenge for farmers is to sell vegetables in Kolhapur district | Page 4 ||| Agrowon

भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान; संचारबंदीमुळे अनंत अडचणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन नियमावलीअंतर्गत आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. अनेक गावांमध्ये गावातील प्रमुख ठिकाणी बसून शेतकरी भाजीपाला विक्री करत असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन नियमावलीअंतर्गत आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. अनेक गावांमध्ये गावातील प्रमुख ठिकाणी बसून शेतकरी भाजीपाला विक्री करत असल्याचे चित्र आहे. परंतु संचारबंदीमुळे आवश्‍यक त्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत नसल्याने त्याचा भाजीपाला विक्रीवरही पडत आहे. काढलेला भाजीपाला विकण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.

लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी ग्रामीण भागात सुरक्षित अंतर ठेवून आठवडी बाजार सुरु होते. निर्बंध कडक करण्याचे ठरल्यानंतर ग्रामपंचायतींनी मास्क सक्तीचे करीत बाजारावर परिणाम होवू दिला नव्हता. परंतु ही नियमावली जाहीर झाल्यानंतर मात्र आठवडी बाजारावर परिणाम झाला आहे. प्रत्येक गावात स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जात आहेत.

शहरी भागातील बाजारसमित्या, बाजारपेठेत सौदे सुरु असल्याने गावातही बाजार सुरु करावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. पण संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने ग्रामपंचायतीनी सावध पवित्रा घेतला आहे. यामुळे लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी जागा मिळेल त्या ठिकाणी बसून शेतकऱ्यांनी किरकोळ प्रमाणात भाजीपाला विक्री केली. अद्याप लॉकडाऊनचा कालावधी जादा असल्याने आता पुढील पंधरा दिवसांचे नियोजन कसे करायचे या चिंतेत भाजीपाला उत्पादक आहेत.

प्रतिक्रिया..
जर ग्राहकांनी पुरेशी खरेदी केली नाही तर अतिरिक्त भाजीपाला होऊन दर घसरू शकतात. याउलट निर्बंध कडक केले तर भाजीपाल्याची काढणी कमी होऊन चणचण निर्माण होवू शकते. सध्या तरी पुढील दिवसांत शासनाने बाजाराबाबत काय धोरण जाहीर होइल व त्याची अंमलबजावणी ग्रामस्तरावर कशी होइल याबाबत नक्की सांगता नाही. भाजीपाल्याची दररोज किती काढणी करायची याबाबत नेमका अंदाज आम्हाला येत नाही. यामुळे नुकसान होण्याची शक्‍यता जादा आहे.
- अप्पासाहेब पाटील, 
मौजे सांगाव, जि. कोल्हापूर

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...
अकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...
निधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...
दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...
पेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
विदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...
संसद अधिवेशन : पहिल्याच दिवशी सरकारची...नवी दिल्ली ः संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या...
सिंधुदुर्गात संततधार सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खासगी कृषी महाविद्यालयांमधील वेतन...पुणेः राज्यातील खासगी विनाअनुदानित कृषी...
देशात साखरेच्या शिल्लक साठ्यात घट कोल्हापूर: गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी ः डॉ. पंजाबराव देशमुख कर्ज व्याज...
गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...
प्रत्यक्ष राबणाऱ्या हातांच्या मदतीला...नेपाळची सीमा, हिमालयात सतत होणारे वातावरणीय बदल...
कृत्रिम रेतनातून उच्च दर्जाच्या...नागपूर : दुधाचे उत्पादन आणि पशुधन वाढविण्यासाठी...
मध्य, उत्तर महाराष्ट्रात पावसाची ओढ पुणे : पावसाचा हंगाम सुरू होऊन तब्बल दीड महिना...