शेतीमधील आव्हाने निसर्ग आणि मानवनिर्मित ः कुलगुरू डॉ. अशोक ढवण

Challenges in Agriculture Nature and Man-made: VC. Ashok Dhawan
Challenges in Agriculture Nature and Man-made: VC. Ashok Dhawan

औरंगाबाद : शेतीमध्ये जी आव्हाने निर्माण झाली आहेत ती निसर्ग व मानवनिर्मित असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्‍त केले. 

औरंगाबाद येथील श्री धनेश्‍वरी शैक्षणिक संकुलात ‘शेतीतील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर शनिवारी (ता. २९) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उद्‌घाटक आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. ढवण बोलत होते. 

या कार्यशाळेला वनामकृविचे अधिष्ठाता डॉ. डी. एन. गोखले यांची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील होते. सुरुवातीला कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. झोटे यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. 

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आपल्या मार्गदर्शनातून कृषी जैवतंत्रज्ञानावर भर देण्याचे आवाहन केले. डॉ. वेदप्रकाश पाटील म्हणाले, अन्न व उत्पादने यातील घटकावर भर देणे गरजेचे असून ही प्रक्रिया दुय्यम स्थानी आहे. सौरऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारक संबोधन होत आहे. नव्या पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यावा. औद्योगिक क्रांतीचे चार टप्पे विस्तृतपणे मांडताना वाफेवर चालणारी यंत्रे, डिझेल पेट्रोलचा वापर, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आदींविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात डॉ. एस. एस. माने, नंदकुमार कुचगे, सी. एस. पाठक, अभिजित शिल्लक, डॉ. बी. के. साखळे यांनी मार्गदर्शन केले. 

भित्तिपत्रके व माडेल स्पर्धेत १४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तसेच जवळपास ९०० विद्यार्थी व इतर व्यक्‍तींनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. सहा स्पर्धकांची निवड होऊन त्यांना धनेश्‍वरी शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उदयसिह पाटील यांच्यासह मार्गदर्शकांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. सविता वाघ, व्यवस्थापन रमेश भालकर, भारत चव्हाण यांनी केले. कार्यशाळेसाठी कृषी जैवतंत्रज्ञान आणि अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. झोटे, डॉ. ए. व्ही. वैद्य, बी. एम. राठोड, डॉ. जी. के. बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com