चणकापूर पाणीप्रश्नी उमराणे बंद

चणकापूर पाणीप्रश्नी उमराणे बंद
चणकापूर पाणीप्रश्नी उमराणे बंद

नाशिक : चणकापूर वाढीव उजव्या कालव्याचे पूरपाणी थेट कुंभार्डे गावात पहिल्यांदा सोडण्यात यावे, चणकापूर ते झाडी एरंडगाव कालव्याद्वारे चणकापूर धरणातून हक्काचे पाणी मिळावे, तसेच कालव्याचे रुंदीकरण करण्यात यावे. रामेश्वर धरणातून व दहिवड येथील चिचलवन पाझर तलावातून कालवा बायपास करण्यात यावा या मागण्यांसाठी रविवारी (ता. २५) पुकारण्यात आलेल्या उमराणे बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी (ता. २४) रात्री पोलिस, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग व ग्रामस्थांमध्ये झालेल्या बैठकीत कुंभार्डे गावालाच पहिल्यांदा पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे बंद पाळून बेमुदत गावबंदची हाक मागे घेतली. जिल्ह्यात विविध ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे. मात्र देवळा तालुक्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे, त्यामुळे चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर धरण भरल्यानंतर चणकापूर वाढीव उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. मात्र हे पाणी थेट की सुरवातीपासून सोडायचे याबाबत मतमतांतरे झाल्यानंतर उमराणे परिसरातील गावांनी एकत्र येत शासनाच्या नियमाप्रमाणे ‘टेल टू हेड’ असे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली. अजूनही या भागात टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या कुंभार्डे येथे पहिल्यांदा पाणी सोडण्यात यावे यासाठी आग्रह धरला, त्यासाठी रविवार (ता. २५) उमराणे बंदची हाक दिली होती. या आवाहनाला गावातील सर्व स्तरांतील नागरिकांनी प्रतिसाद देत उमराणे बंद १०० टक्के यशस्वी करून दाखविला. बंद व निवडणुकांच्या बहिष्कारानंतर अखेर चर्चेतून तोडगा  कुंभार्डे येथे पाणी मिळत नाही तोपर्यंत उमराणे बंद व निवडणुकांवर बहिष्काराच्या निर्णयावर सर्व गावे ठाम होती. मात्र पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, साहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्यासह स्थानिक सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी पोलिस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग, महसूल विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने कुंभार्डे येथे पहिल्यांदा पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यामुळे उमराणे ग्रामस्थांनी बंद पाळून बेमुदत गावबंदची घोषणा मागे घेतली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com