Agriculture news in Marathi Chance of hail in the south area | Agrowon

दक्षिण भागात गारपिटीची शक्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 एप्रिल 2021

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत.

पुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. येत्या आठवडाभर राज्याच्या दक्षिण भागात वादळ, गारपिटीसह पूर्वमोसमीच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

सध्या बिहार ते दक्षिण तमिळनाडू, झारखंड, उडिसा, विदर्भ, तेलंगाना आणि रायलसीमा दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच झारखंड ते मध्य प्रदेशचा आग्नेय भागातही कमी दाबाचा पट्टा आहे. तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तर गुजरातच्या दक्षिण भाग आणि राजस्थानचा आग्नेय व नैऋत्य भागातही चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. मध्य प्रदेशचा परिसर व उत्तर प्रदेशाच्या ईशान्य भागातही चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या भूपृष्टभागावरून वाहत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसत आहेत.

सध्या उन्हाच्या झळा सकाळपासून तीव्र होत आहे. त्यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे सर्वात कमी १९.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. शनिवारी (ता. २४) दुपारनंतर सातारा, नाशिक, लातूर या जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन ढग जमा झाल्याने तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी
पडल्या होत्या.

या जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता
मंगळवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव,  नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ.
बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.
गुरुवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया नागपूर, वर्धा, यवतमाळ.
शुक्रवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया नागपूर, वर्धा, यवतमाळ.


इतर ताज्या घडामोडी
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के...नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात...
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली...कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६)...
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ...नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प...
मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा...अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात...
सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक...
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या...
केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान...शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंतपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...