Agriculture news in Marathi Chance of heavy rain | Agrowon

जोरदार पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच कमाल तापमानात ही वाढ झाली आहे. काही भागांत पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती झाल्याने कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे.

पुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच कमाल तापमानात ही वाढ झाली आहे. काही भागांत पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती झाल्याने कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. दरम्यान, येत्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.  

सध्या सकाळपासून वातावरणात बदल होत आहे. सकाळी काही अंशी ढगाळ वातावरण, तर दुपारी किंचित असलेले ऊन, तर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण अशी स्थिती असते. यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. नांदेड, डहाणू येथे घट होऊन ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले.

विदर्भात कमाल तापमानाचा पारा अधिक वाढलेला होता. शुक्रवारी (ता. ९) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. काही भागात किमान तापमानातही वाढ झाली असून, महाबळेश्‍वर येथे २० सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि परिसर बिहार ते पूर्व विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच विदर्भ ते दक्षिण तमिळनाडू, तेलंगाणा, कर्नाटक आणि रायलसीमा या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून, तो समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. मध्य प्रदेशाच्या दक्षिण भागातही चक्रीय स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे.

येथे अवकाळीची शक्यता
शनिवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ
रविवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा.

विदर्भाच्या पूर्व भागात हलक्या सरी
राज्यात दोन ते तीन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण बनले आहे. गुरुवारी रात्री छत्तीसगड आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. यामध्ये चंद्रपूरमधील सावळी ४.२ मिलिमीटर, गडचिरोलीतील अरमोरी १० मिलिमीटर, गोंदियातील सालेकसा ४.६ मिलिमीटर, यवतमाळमधील राळेगाव ३.१ मिलिमीटर पाऊस पडला. 


इतर बातम्या
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
माढा, उत्तर सोलापूर, अक्कलकोटला पाऊससोलापूर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) काही भागात...
उजनीचे पाणी पळविण्याचा प्रश्न...सोलापूर ः उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याला...
जळगाव जिल्ह्यातील पीक कर्जवाटपाला गती...जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी पीक कर्जवाटप गेल्या...
वार्सा येथे पाणीटंचाईशी पंधरा...वार्सा, जि. धुळे : धज्या आंबापाडा येथील...
बीडमध्ये वादळी पावसाचा दुसऱ्या दिवशीही...बीड : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा...
नांदेड जिल्ह्यात पावसाचा तडाखा सुरुच नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मुक्काम...
‘लिंबोटी’चे पाणी २३ गावांना मिळणारनांदेड : कंधार तसेच लोहा तालुक्यातील संभाव्य...
साताऱ्यात आले लागवडपूर्व कामांना गतीसातारा ः जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या शुभ...
पुणे बाजार समितीमध्ये लसीकरणाला प्रारंभपुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीच्या वतीने...
केवळ जाहिरातींद्वारे कोरोना संपणार नाही...मुंबई ः कोरोना परिस्थिती लक्षात घेता ‘एक देश एक...
कोरोनानंतर ‘कृषी’चा अनुशेष दूर करणार ः...नागपूर : विदर्भातच नाही तर राज्याच्या कृषी...
कृषी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धसकाकोल्हापूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव...
बुलडाण्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांना...बुलडाणा : सातत्याने संकटाचा सामना करणाऱ्या...
कांदा बियाणे भेसळीचा शेतकऱ्यांना फटकाश्रीरामपूर, जि. नगर ः यंदा खरिपात कांदा उत्पादक...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...