राज्यात जोरदार पावसाची शक्यता

राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली आहे. आज (ता. २३) कोकण, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Chance of heavy rain
Chance of heavy rain

पुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली आहे. आज (ता. २३) कोकण, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून, जोधपूर, गुणा, अंबिकापूर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, बलसोर ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पश्‍चिम राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. 

नवीन कमी दाब क्षेत्राचे संकेत बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि परिसरावर आहे. म्यानमारच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. २४) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, ते ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. 

उद्या (ता. २३) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, कोकण, विदर्भ बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. 

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी.  मराठवाडा : औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना. विदर्भ : अकोला, वाशीम, यवतमाळ.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर. मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड. विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वर्धा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com