Agriculture news in Marathi Chance of heavy rain | Agrowon

राज्यात जोरदार पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली आहे. आज (ता. २३) कोकण, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली आहे. आज (ता. २३) कोकण, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून, जोधपूर, गुणा, अंबिकापूर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, बलसोर ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पश्‍चिम राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. 

नवीन कमी दाब क्षेत्राचे संकेत
बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि परिसरावर आहे. म्यानमारच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. २४) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, ते ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. 

उद्या (ता. २३) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, कोकण, विदर्भ बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. 

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी. 
मराठवाडा : औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना.
विदर्भ : अकोला, वाशीम, यवतमाळ.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड.
विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वर्धा.


इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...