सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता

आज (ता. २७) विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Chance of heavy rain everywhere
Chance of heavy rain everywhere

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. मंगळवारपर्यंत (ता. २८) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. आज (ता. २७) विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून, कोटा, सागर ते बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीपर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट’ गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज विदर्भ, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील बीड उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, विदर्भातील अमरावती, वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) मध्य महाराष्ट्र : जळगाव : मुक्ताईनगर ३५, नाशिक : नांदगाव ५७, पुणे : इंदापूर ३२, सोलापर : माढा ४२, मंगळवेढा ४५, मोहोळ ६६, सांगोला ३५, सेालापूर ३०. मराठवाडा : औरंगाबाद : कन्नड ६७, वैजापूर ४५, बीड : आष्टी ३८, बीड ३९, धारूर ३८, केज ३०, वाडवणी ७२, हिंगोली : हिंगोली ३२, निलंगा ३८, उस्मानाबाद : भूम ६८, कळंब ३०, उस्मानाबाद ४१, वाशी ३८.  विदर्भ : अकोला : मूर्तिजापूर ३४, अमरावती : अमरावती ४५, बटकुली ३१, चांदूरबाजार २६, बुलडाणा : बुलडाणा ३४, नागपूर : हिंगणा ३६, वर्धा : देवळी ३१. सेलू ४०, वाशीम : मालेगाव ३२, मंगरूळपीर ३४, रिसोड ३३, यवतमाळ : नेर ३१, पांढरकवडा ३४.

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट)  विदर्भ : चंद्रपूर. जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)  कोकण ः रायगड, रत्नागिरी. मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, नाशिक. मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भ : गडचिरोली, यवतमाळ,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com