Agriculture news in Marathi Chance of heavy rain on Konkan, Ghatmathya | Agrowon

कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

राज्याच्या अनेक भागांत ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उद्या (ता. ६) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने राज्याच्या अनेक भागांत ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उद्या (ता. ६) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर बंगालच्या उपसागर व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर भारतातील वायव्य मध्य प्रदेशात हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून, त्याची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून कमी दाब क्षेत्राच्या केंद्रामधून बांग्लादेश, अरुणाचल प्रदेशकडे आहे. 

मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज (ता. ५) उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरीसह, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भ काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

येथे होणार जोरदार पाऊस 
गुरुवार ः
रायगड, रत्नागिरी, राज्यात तुरळक
शुक्रवार ः संपूर्ण राज्यात तुरळक
शनिवार ः संपूर्ण राज्यात तुरळक
रविवार ः संपूर्ण राज्यात तुरळक


इतर अॅग्रो विशेष
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...