Agriculture news in Marathi Chance of heavy rain in sparse places | Agrowon

तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

आज (शुक्रवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

पुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टी दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग ते उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम  राज्यातील वातावरणावर होत आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. आज (शुक्रवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  

राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने अनेक भागात उघडीप दिली आहे. काही भागात पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. त्यामुळे काही अंशी ढगाळ हवामान राहत असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भात पावसाचा जोर कमी असला तरी इतर भागात कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यातच परतीच्या पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती तयार होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत असून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणाची स्थिती तयार होत आहे.

उद्या (शनिवारी) कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. तर विदर्भात व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील. रविवारी (ता. २०) व सोमवारी (ता. २१) कोकण व मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मराठवाडा व विदर्भात काही भागात पावसाचा शिडकावा होईल.


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...