Agriculture news in Marathi Chance of light rain with cloudy weather | Agrowon

ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 डिसेंबर 2021

राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

पुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

‘जवाद’ चक्रीवादळ निवळल्यानंतर पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनारपट्टीजवळ वाहणारे चक्राकार वारे, महाराष्ट्र लगतच्या अरबी समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. तर वायव्य भारतात थंडी वाढू लागली असून, राजस्थानात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (ता. ८) चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच, अनेक भागांत अंशतः ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. बुधवारी (ता. ८) पुणे येथे नीचांकी १४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.५ (१४.३), नगर २९.४ (-), जळगाव २९.३ (१८.५), कोल्हापूर २९.४ (१८.५), महाबळेश्‍वर २३.२(१४.४), मालेगाव २६.४ (-), नाशिक २७.४ (१५.८), निफाड २७.० (१५.८), सांगली ३०.४ (१७.२), सातारा २८.८(१५.५), सोलापूर ३२.४ (१७), सांताक्रूझ ३३.२(२३.४), अलिबाग ३२.४ (२१.०), डहाणू ३०.६ (२०.८), रत्नागिरी ३२.२ (२१.०), औरंगाबाद २९.० (१५.६), नांदेड २९.७ (१९.४), उस्मानाबाद - (१९.४), परभणी २९.८ (१९.३), अकोला ३०.४ (१९.९), अमरावती २८.८ (१७.२), ब्रह्मपुरी ३२.५ (१७.२), बुलडाणा २७.८ (१७.२), चंद्रपूर ३०.० (१८.२), गडचिरोली ३१.०(१७.६), गोंदिया २९.६ (१४.४), नागपूर ३०.१ (१७), वर्धा ३० (१७.४), वाशीम २७.५ (१४), यवतमाळ ३० (१६.५).


इतर अॅग्रो विशेष
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
लोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...