राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता

राज्यात बुधवारपासून (ता. १) पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. आज (ता. ४) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Chance of light rain with cloudy weather in the state
Chance of light rain with cloudy weather in the state

पुणे : राज्यात बुधवारपासून (ता. १) पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. आज (ता. ४) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी (ता. ३) गडचिरोली येथे नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.गुरुवारी (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग)

कोकण : वैभववाडी ६०, वेंगुर्ला ५०, कणकवली, लांजा प्रत्येकी ३०. मध्य महाराष्ट्र : पंढरपूर ४०, सांगोला, गगनबावडा प्रत्येकी ३०, कोल्हापूर, मंगळवेढा, मोहोळ प्रत्येकी २०. मराठवाडा : औसा ५०, लातूर ३०, उस्मानाबाद, चाकूर प्रत्येकी २०.

पावसाची शक्यता असलेले जिल्हे  कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com